शहीद जवान सुनील काळे यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्याची गृहमंत्र्यांची ग्वाही

0
488

गृहमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांकडून काळे कुटुंबाला ग्वाही

सोलापूर, दि.२७: पुलवामा येथे अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेले सुनील काळे यांच्या कुटुंबातील एकाला शिक्षणानुसार शासकीय सेवेत घेण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पानगाव (ता. बार्शी) येथे शहीद काळे यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन श्री. देशमुख, श्री. टोपे, श्री. भरणे यांनी शनिवारी सांत्वन केले.

यावेळी त्यांच्यासमवेत आमदार राजेंद्र राऊत, संजय शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम साठे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.

शहीद काळे यांची भाची वर्षा काळे यांनी कुटुंबाबाबत माहिती दिली. काळे कुटुंबीय जिरायती शेतीवर अवलंबून आहे. मामीला आधार देण्यासाठी कोणी नाही, एकाला शासकीय सेवेत घेण्याची तिने मागणी केली होती.

यावर श्री. देशमुख म्हणाले, आम्हाला शहीद काळे यांचा अभिमान आहे. शासन खंबीरपणे कुटुंबाच्या पाठिशी आहे. वीर जवानाचा आम्हाला अभिमान असून काळे कुटुंबाला लागेल ती मदत शासन करेल, असे श्री. भरणे यांनी आश्वस्त केले.

पानगाव ता बार्शी येथील शाहिद जवान सुनील काळे यांच्या घरी भेट देऊन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सोलापूर चे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले..

Global News Marathi ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಜೂನ್ 27, 2020

शासकीय मदतीबरोबर खास बाब म्हणून काळे कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत घेण्याचा प्रयत्न शासन करेल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे श्री टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी शहीद जवान सुनील काळे यांच्या आई कुसुम काळे, पत्नी अर्चना, मुले श्री आणि आयुष, भाऊ नंदकुमार आणि किरण उपस्थित होते.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here