शरद पोंक्षेंचा राष्ट्रवादीशी संबंध नव्हता,अन कधीच नसेल : जयंत पाटील
राष्ट्रवादीच्या मंचावर गांधी हत्याचे समर्थन करणारे शरद पोंक्षे उपस्थित
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या सामाजिक, विधायक कार्यासंबंधी माहिती देण्यासाठी मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टच्य विश्वस्त मंडळातील सदस्यांनी ट्रस्ट तर्फे करण्यात आलेल्या विविध सामाजिक कार्याची माहिती दिली.
तसेच उपस्थित विविध वैद्यकीय संघटना व कलावंत प्रतिनिधींनी ट्रस्टने केलेल्या मदतीबद्दल आभार मानतानाच आपल्या भावनाही व्यक्त केल्या. मात्र या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यवाही प्रमुख तथा गांधी हत्याचे समर्थन करणारे अभिनेते शरद पोंक्षे यांच्या हजेरीने राष्ट्रवादी जोरदार टीका केली जात आहे.
दरम्यान, कोरोनाच्या संकटकाळात राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून जी मदत केली गेली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो अशा भावना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यवाही प्रमुख, अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली.

मागच्या काळात अजित दादांनी रंगभूमीला ५ कोटी रुपयांची मदत केली होती. अशीच मदत या संकटकाळातही करावी, अशी विनंतीही शरद पोंक्षे यांनी अजित पवार यांना यावेळी केली. मात्र गांधी विचारांवर चालणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंचावर गांधी हत्याचे समर्थन करणारा शरद पोंक्षे यांची हजेरी चर्चेचा विषय बनली आहे.
दरम्यान अभिनेते शरद पोंक्षे यांचा राष्ट्रवादीशी कधीच संबंध नव्हता, आणि यापुढेही कधीच नसेल, असं स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी दिलं आहे. शरद पोंक्षे राष्ट्रवादीच्या कार्यालयात आल्याने तर्कवितर्क लढवले जात होते. (Jayant Patil on Sharad Ponkshe connection with NCP)
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने बॅकस्टेज कलाकारांना कोरोना काळात तीस लाखांहून अधिक रकमेची आर्थिक मदत करण्यात आली. याबद्दल आभार मानण्यासाठी शरद पोंक्षे हे नाट्य परिषद पदाधिकारी, नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासोबत पक्ष कार्यालयात आले होते. या पलिकडे शरद पोंक्षे यांचा आणि पक्षाचा कोणताही संबंध नाही व कधीच नसेल, असं जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितलं.