शरद पवारांचे पत्र मोदींसाठी नेहमी मार्गदर्शक, रोहित पवारांचे फडणवीसांना प्रतिउत्तर

0
143

शरद पवारांचे पत्र मोदींसाठी नेहमी मार्गदर्शक, रोहित पवारांचे फडणवीसांना प्रतिउत्तर

सुरज गायकवाड

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्लोबल न्यूज: शरद पवार यांच्या दांडग्या अनुभवामुळे त्यांचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असते. त्यामुळे शरद पवारांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो, याचे आत्मपरीक्षण केले तर ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल, असे प्रत्युत्तर कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील शेतकरी तसेच विविध प्रश्नांबाबत निवेदन दिले. त्यानंतर पत्रकरांशी बोलताना केंद्राप्रमाणेच राज्य सरकारही आर्थिक पॅकेज जाहीर करावे. शरद पवार हे पंतप्रधान मोदींना पत्र लिहून विविध मागण्या करत आहेत.

त्यांनी एखादे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लिहून शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेजची मागणी करावी, अशी टीका फडणवीसांनी केली होती. या टिकेला रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री असताना आणि दिल्लीच्या राजकारणापासून अनभिज्ञ असल्यामुळे यूपीए सरकारमध्ये त्यावेळी कृषी मंत्री असलेल्या शरद पवारांनी आपणाला खूप मार्गदर्शन केले.

पवारांचे बोट धरूनच आपण राष्ट्रीय राजकारणात आल्याचे मोदींनी काही वर्षांपूर्वी म्हटले होते. त्यामुळे पवारांचे पत्र मोदींसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरते, या रोहित पवारांच्या दाव्याला फडणवीस किंवा भाजप काय उत्तर देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.