व्यावसायिक अभ्यासक्रम: अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

0
448

व्यावसायिक अभ्यासक्रम: अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

ग्लोबल न्यूज: अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य राज्य सरकारनं बिगर व्यावसायिक / व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अंतिम वर्षाची /अंतिम सेमिस्टर परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याचे वातावरण अद्याप कोणतीही परीक्षा किंवा वर्ग घेण्यास अनुकूल नसल्याने बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांची अंतिम वर्षाची / अंतिम सेमेस्टर परीक्षा न घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

विद्यापीठांनी ठरवलेल्या सूत्रानुसार अखेरच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री कार्यालयानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील यासंदर्भात एक पत्र लिहिलं आहे. तसंच यामध्ये त्यांनी एआयईसीटीई, सीओए, पीसीआय, बीसीआय, एनसीटीई आणि नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीलाही राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाला मंजुरी देण्याचे आदेश द्यावी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

यापूर्वी करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून एमडी / एमएस या परीक्षा पुढेढकलण्याची विनंती केली होती. तसंच ही परीक्षा डिसेंबर २०२० पर्यंत तहकूब करण्याची विनंतीही राज्य शासनाने मेडीकल कौन्सिल ऑफ इंडियाला केली आहे. सध्या राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. तसंच सर्व सरकारी डॉक्टरही रुग्णांच्या सेवेत दिवसरात्र झटत आहेत. या सर्व परिस्थितीत, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने एमडी / एमएसच्या परीक्षांचं ३० जुलैपूर्वी आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here