विक्रेत्यामधली माणुसकी: दोन महिन्यांपासून वाटतोय मास्क

0
436

अमोल सिताफळे

विक्रेत्यामधली माणुसकी: दोन महिन्यांपासून वाटतोय मास्क

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा
  • गरिबांच्या आरोग्याची घेतली काळजी
  • लोक करताहेत दशरथ यांचे कौतुक

सोलापूर – कोरोना व्हायरसचा प्रसार आता अधिक वेगाने होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. यापासून सुरक्षित राहण्यासाठी डॉक्टर आणि प्रशासन हॅण्ड सॅनिटायझर आणि मास्क वापरणे वारंवार सांगत आहेत. यातच हॅण्ड सॅनिटायझर आणि मास्कच्या किमती दुपटीने वाढल्या. गरिबांना ते देखील घेणे परवडत नाही. अशातच शहरामधील एक मास्क विक्रेता आपल्यातली माणुसकी दाखवत लोकांना मोफत मास्क वाटत आहे.

कुंभारवेस जवळील क्षेत्रीय गल्लीत राहणारे 53 वर्षीय दशरथ शालगर हे गेल्या दोन महिन्यापासून विक्रेता लोकांना मोफत मास्क वाटत आहे. कुंभारवेस परिसरात शालगर स्वत: मास्क तयार करुन विकतात. याच दरम्यान त्यांना काही गरीब लोकांकडे पैसे नसल्याने मास्क घालत नसल्याचे दिसून अाले. ते जर मास्क नाही घातले तर त्यांचे अारोग्य धोक्यात येईल म्हणून  त्यांनी स्वतःहून लोकांना मोफत मास्क देण्याचे ठरवले.

त्यांच्या समोरून एखादा माणूस मास्क न घालता जात असेल तर ते स्वतःहून त्यांना मास्क घालण्यासाठी देतात. दिवसभरातून दहा ते पंधरा लोकांना मास्क देतात. मास्कची किंमत जवळजवळ वीस ते तीस रुपये आहे. लोकांना मास्क दिल्याने आपल्या व्यवसायात तोटा येईल याचा फारसा विचार न करता ते लोकांना मोफत मास्क देतात. रस्त्यावरून जाणारे येणारे लोक देखील त्यांच्या या कामाचे कौतुक करतात.

दशरथ शालगर हे गारमेंटच्या कपड्यापासून टोपी, पिशव्या, लहान मुलांचे कपडे, झबले, लेडीज पर्स तयार करून विकतात. गेल्या बावीस वर्षांपासून ते आपला परंपरागत व्यवसाय सांभाळत आहेत. बाजारात सध्या मास्कला मागणी असल्यामुळे ते मास्क तयार करत आहेत. ते विकून त्यांना दिवसाकाठी अडीशे रुपये मिळतात. यावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मास्क तयार करण्यासाठी त्यांच्या पत्नी उमा या देखील त्यांना मदत करतात.

कोट

आशीर्वाद मिळतात म्हणून. . .

रस्त्यावर जर एखादा गरीब माणूस विना मास्क फिरत असेल तर मी त्याला आवर्जून मोफत मास्क देतो. यामुळे व्यवसायात तोटा येईल याचा मी विचार करत नाही. सामाजिक भावना म्हणून मी लोकांना मदत करतो. असे केल्याने लोकांचा आशीर्वाद लाभेल अशी प्रतिक्रिया दशरथ शालगर यांनी ग्लोबल न्यूज शी बोलताना दिली.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here