“वरळी मॉडेल” राज्याला दिशा देणारे ठरणार आदित्य ठाकरेंचा विश्वास

0
118

“वरळी मॉडेल” राज्याला दिशा देणारे ठरणार आदित्य ठाकरेंचा विश्वास

सूरज गायकवाड

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्लोबल न्यूज: काही दिवसांपूर्वी वरळी हा विभाग कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता मात्र आता कोरोनाच्या संकटावर मात करत वरळी मॉडेल राज्याला दिशा देणारे ठरणार असा विश्वास पर्यावरण, पर्यटन तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईतील वरळी भागात राहणाऱ्या, वयाची नव्वदी पार केलेल्या आजींनी ‘कोरोना’वर मात केली आहे. आजींचा व्हिडिओ ट्वीट करत याची माहिती मंत्री आदित्य ठाकरे यांनीं दिलेली आहे.

“वरळी मॉडेल आशादायी वाटत आहे. ‘कोरोना’ निगेटिव्ह ठरलेली 90 वर्षांवरील ही महिला आम्हाला प्रेरणा देते. त्यांनी कोरोनाशी लढा दिला आणि आता त्या घरी परतल्या आहेत. आपल्याला हेच दाखवायचं आहे. माणुसकी म्हणजे दुसरं काही नाही, तर इतरांना प्रेरणा देऊन नेटाने उभे राहणे’ असे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे”*