लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे टॉप फाईव्ह मध्ये ..

0
302

सुरज गायकवाड

ग्लोबल न्युज : कोरोनाचे संकट हाताळण्याच्या मुद्द्यावरून विरोधक राज्यातील महाविकास आघाडी सरकारला नावे ठेवत असले तरी, IANS आणि सी व्होटर्स या संस्थेने संयुक्तरीत्या केलेल्या सर्वेक्षणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाला लोकांनी पसंती दिली आहे. देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे यांचा समावेश झाला आहे. त्यांना या सर्वेक्षणात 76.52 टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. विशेष म्हणजे भाजपशासित राज्यांच्या एकाही मुख्यमंत्र्यांचा पहिल्या पाचमध्ये समावेश नाही

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी IANS आणि सी व्होटर्स या संस्थेने संयुक्तरीत्या केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे. या सर्वेक्षणानुसार बिजू जनता दलाचे नेते, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत.

82.96 टक्के लोकांनी त्यांच्या कामाबद्दल समाधानी असल्याचे म्हटले आहे. त्या खालोखाल काँग्रेसचे नेते छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (81.6%) केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (80.28%), वायएसआर काँग्रेसचे प्रमुख, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (78.52%) यांना पसंती मिळाली आहे

तर पाचव्या स्थानावर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश झाला आहे त्यांना 76.52% मते मिळाली आहेत. त्यांच्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा क्रमांक लागला असून त्यांना 74 टक्के मते आहेत

राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदींना पसंती

राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर बहुतांश लोकांनी शिक्कामोर्तब केलं 66.20 टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांना पसंती दर्शवली तर 23.20 टक्के लोकांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पसंत असल्याचे म्हटले आहे.

सर्वात कमी लोकप्रियता असलेल्या भाजपच्या तीन मुख्यमंत्र्यांचा समावेश

सर्वात कमी लोकप्रियता असणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी तीन मुख्यमंत्री हे भाजपशासित राज्यांत मधील आहेत. यामध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा समावेश आहे. तळाच्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये जनता दल युनायटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि काँग्रेसची सत्ता असणाऱ्या पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा समावेश आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur