लोकडाऊन बाबत मंत्री अमित शहा यांची राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा

0
207

लोकडाऊन बाबत मंत्री अमित शहा यांची राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा

ग्लोबल न्यूज: कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपायला काही दिवस बाकी राहिलेले असतानाच आता लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याचा विचार केंद्र सरकारने सुरु केला आहे. पण त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातील लॉकडाउनसंबंधी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं मत जाणून घेतलं.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

एका प्रतिष्ठित वृत्तसमूहाने यासंबंधी वृत्त दिले आहे. या बैठकीत त्यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. अमित शाह यांनी लॉकडाऊन वाढवण्याबाबत सर्व मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. देशात 31 मे नंतर लॉकडाऊन वाढवलं तर त्याच्या गाईडलाईन्स काय असाव्यात, याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

तसेच 31 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ‘मन की बात’ कार्यक्रमादरम्यान मोदी लॉकडाऊन वाढवण्याबाबत घोषणा करतील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 15 दिवस लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. दरम्यान, लॉकडाउनचा चौथा टप्पाही ३१ मे रोजी संपत असून त्यामध्ये वाढ करायची की नाही किंवा निर्बंध शिथील करायचे यासंबंधी केंद्र सरकार चर्चा करत आहे. याचाच भाग म्हणून अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur