लॉकडाऊनमध्ये पार्ले जी बिस्किटांचा विक्रीचा उच्चांक

0
472

ग्लोबल न्यूज- कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊनचा अनेक उद्योगांना मोठा फटका बसला आहे. परंतु, पार्ले जी बिस्किटांची इतकी विक्री झाली आहे की त्यांनी मागील 82 वर्षांचा आपला विक्रम मोडला आहे.

अवघ्या 5 रुपयांत मिळणारे पार्ले-जी बिस्किटाचे पॅकेट शेकडो किमी चालत जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूप मौल्यवान ठरले आहे. काहींनी स्वतः हे बिस्कीट खरेदी केले, तर काहींना दुसऱ्यांनी मदत म्हणून बिस्कीट वाटले. अनेक लोकांनी तर आपल्या घरात पार्ले-जी बिस्किटांचा स्टॉक जमा करुन ठेवला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पार्ले जी 1938 पासूनच लोकांचा अत्यंत आवडता ब्रँड आहे. लॉकडाऊनदरम्यान आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक बिस्किट विकण्याचा विक्रम बनला आहे. पार्लेने ऐतिहासिक कामगिरी केली असली तरी त्यांनी किती विक्री झाली याची माहिती दिलेली नाही. परंतु, मार्च, एप्रिल आणि मे मागील 8 दशकातील सर्वांत चांगले महिने ठरले आहेत.

पार्ले कंपनीचा मार्केटमधील हिस्सा सुमारे 5 टक्क्यांनी वाढला आहे. यामध्ये 80 ते 90 टक्के वाढ पार्ले जीच्या विक्रीमुळे झाली आहे.

फक्त पार्ले जी नव्हे तर मागील तीन महिन्यात लॉकडाऊनदरम्यान इतर कंपन्यांच्या विक्रीतही वाढ झाली. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, ब्रिटानियाचे गुड डे, टायगर, मिल्क बिकिस, बॉर्बन आणि मारी बिस्किटांशिवाय पार्लेचे क्रॅकजॅक, मोनॅको, हाईड अँड सीक सारख्या बिस्किटांचाही मोठ्याप्रमाणात खप झाला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur