लढा कोरोनाशी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २० लाख रुपयांची मदत

0
65

लढा कोरोनाशी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २० लाख रुपयांची मदत

बार्शी : कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे स्थापित
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २० लाख रुपयांची मदत निधी प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. कर्मवीर डॉ मामांनी सांगितलेल्या 0ब’एक मेका सहाय्य करू l अवघे धरू सुपंथ’ या विचारांची प्रचिती आज पुन्हा एकदा आली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

प्रतिकूल परिस्थिती बहुजन समाजाच्या विध्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य कर्मवीर मामांनी १९ व्या शतकात केले. बार्शी सारख्या ग्रामीण भागात शैक्षणिक व वैद्यकीय क्रांती केली. त्याच मामांचा विचारांचा वारसा जपणारे त्यांचे अनुयायी आजही देश संकटात असताना मदतीसाठी पुढे आले आहेत.

संस्थेच्या महाविद्यालय, शाळा सह सर्व शाखांतील कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार तसेच संस्थेच्या वतीने उर्वरित रक्कम जमा करत २० लाख रुपयांचा धनादेश शासनाकडे जमा करण्यात आला. ज्या ज्या वेळ देश, राज्य संकटात आहेत, अथवा विधायक काम होत असते त्यावेळी संस्थेने सढळ हाताने मोठा निधी देण्याचे कार्य केले आहे. यापूर्वीही कारगील युद्ध, जलयुक्त शिवार योजना, बार्शी शहर व तालुका मधील विधायक कार्य अशा विविध कामासाठी संस्थेने मोठा निधी दिला आहे.

संस्थेच्या वतीने निधी देतेवेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ बी वाय यादव, सचिव व्ही एस पाटील, सहसचिव पी टी पाटील, खजिनदार प्रा. दिलीप रेवडकर, कार्यकारिणी सदस्य बापू शितोळे, डॉ. डी एम मोहिते, सदस्य अरुण देबडवार, श्रीमान राम भाई शाह रक्तपेढीचे उपाध्यक्ष अजित कुंकुलोल, प्रमोद जाधव,निवासी नायब तहसीलदार संजीवन मुंडे, विरेश कडगंची,प्राचार्य डॉ प्रकाश थोरात, प्राचार्य डॉ एस एस गोरे, प्राचार्य डॉ. एस के. पाटील, किरण गाढवे यांच्यासह संस्थेच्या विविध महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.