राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांचे वाढदिवसानिमित्त पतीने केले औक्षण

0
382

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांचे वाढदिवसानिमित्त पतीने केले औक्षण

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांचे वाढदिवसानिमित्त पतीने केले औक्षण

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


पुणे दि.३१ : स्त्री-पुरुष समानता यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अनेक प्रयत्न केल्याचे आपण वाचले आहे. मात्र प्रत्यक्ष जीवनात खरंच स्त्री-पुरुष समानता आहे का? असा प्रश्न अनेक वेळा पडतो मात्र आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांचा वाढदिवस होता त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पती निलेश चाकणकर यांनी औक्षण करुन शूभेच्छा दिल्या. खरं तर आतापर्यंत आपण महिला केवळ पुरुषांचेच औक्षण करतात हे वाचलं होतं पाहिलं होतं आज मात्र रूपालीताई चाकणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आगळंवेगळं औक्षण करण्यात आले.

    ही घटना वाटते तितकी सोपी नाही हे काम करण्यासाठी निलेश चाकणकर यांच्यासारखे मनही मोठे असावे लागते.आतापर्यंत “आपण एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, पण एका यशस्वी स्त्री च्या पाठीमागे देखील एक पुरुष असू शकतो हेच या औक्षणावरून दिसून येते.”याबद्दल खुद्द रूपालीताई चाकणकर यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वर पोस्ट टाकून “सावित्रीच्या लेकी घरोघरी ज्योतिबाचा शोध जारी” अशा आशयाची पोस्ट टाकली आहे ही पोस्ट नेमकी काय आहे हे देखील आपण खाली वाचा.

ही पोस्ट रुपालीताई चाकणकर यांच्या शब्दात आहे.
“साविञीच्या लेकी घरोघरी
जोतिबाचा शोध जारी….”

आज मला हा शोध संपल्यासारखा वाटला, आजच नाही तर कायमच माझ्या पाठीशी भक्कमपणे मला साथ देत माझा सह्याद्रीचा पहाड होत ,माझ्या राजकीय आणि सामाजिक कार्याला शाबासकी देत उत्साह दिला.”लोकांच्या टिकेला डगमगु नकोस, तु चालणारी वाट खडतर असेल पण प्रामाणिक आहे,

तुझ्या चांगल्या वाईट क्षणाला मी बरोबर असेल, तु निर्णय घेत जा”,असं सांगत प्रत्येक क्षणाला उभारी देणारे माझे जोतिबा निलेशजी चाकणकर, आपण दिलेल्या शुभेच्छा आणि सन्मानाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!!

हे प्रत्येक घरात घडायला हवं……हिच मनोकामना.

Best IT Comany In Maharashtra , Solapur