राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल तर गुजरात मध्ये लागू करा -संजय राऊत

0
133

राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल तर गुजरात मध्ये लागू करा -संजय राऊत

राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल तर गुजरात मध्ये लागू करा -संजय राऊत

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सुरज गायकवाड

ग्लोबल न्यूज: महाराष्ट्रातील ठाकरे सरकार मजबूत आहे. शरद पवार हे स्वत: सरकारच्या कामगिरीवर संतुष्ट आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या सरकारला पुढील पाच वर्षात अजिबात धोका नाही. महाविकास आघाडी सरकार पुढील निवडणूकही एकत्र लढेल, असा विश्वास शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर ते मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यावरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु होत्या. त्याबाबत संजय राऊत यांनी रोखठोक भूमिका मांडली.

शरद पवार मातोश्रीवर आले यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे नाही, पंतप्रधान मोदीसुद्धा पवार साहेबांचे मार्गदर्शन घेतात, महाराष्ट्रात कोरोनाचे संकट आहे, महाराष्ट्रात सरकार बनवण्यात त्यांचं योगदान. कोरोनाचा काळ वेदनेचा, लोक घरी आहेत, विरोधकांना काही सुचतंय, पण एक लक्षात ठेवा महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असं महाविकास आघाडीचं आहे, हे पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण करेल, असं संजय राऊत यांनी ठणकावलं.

राज्यात काही कामं होत नाहीत असा आरोप करुन राष्ट्रपती राजवटीची मागणी कोणी करत असेल तर आधी गुजरातमध्ये लावावी लागेल. गुजरातमध्ये इस्पितळांची स्मशाने झालेत, अंधार कोठड्या आहेत, तिथल्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलावून समज द्यायला हवी होती. गुजरात हायकोर्टाने सरकारवर ताशेरे ओढलेत, असं संजय राऊत म्हणाले.