रावसाहेब दानवेवर जावयाचा मोठा आरोप, त्रास दिला तर जीव देईन

0
117

रावसाहेब दानवेवर जावयाचा मोठा आरोप, त्रास दिला तर जीव देईन

ग्लोबल न्यूज: माजी आमदार तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावंइ हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या सासऱ्यांवर खळबळजनक आरोप लगावला आहे. रावसाहेब दानवे हेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला त्रास देत आहेत, मला जगू द्या आणि तुम्ही जगा… पुन्हा मला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर मी जीव देईन आणि तुम्हाला अडचणीत आणीन, अशी धमकी हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी यू-ट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मनात दुःख मांडले असून दानवे यांच्यामुळेच माझी ही अवस्था झाल्याचा आरोप जाधवांनी केला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मनसे नेते व कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आज जाधव यांनी यूट्युबवर व्हिडिओ अपलोड केला असून त्यात केंद्रीय राज्यमंत्री असलेले सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

तुम्हाला वाटतं हा फार फडफड करतो, कुठेही धरून याला कापून टाकू पण मी तुमचे छक्के-पंजे असणारे व्हिडिओ काढले आहेत आणि अनेक वरिष्ठ वकिलांना पाठवले आहेत. मला तुम्ही मारलं किंवा मी आत्महत्या केली, तर तुम्ही वाचणार नाही, इतकं लक्षात ठेवा’, असा इशाराच जाधव यांनी दिला असून या व्हिडिओने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे.