ग्लोबल न्यूज- कोरोनावर औषध काढल्याचा दावा करणारे योगगुरु रामदेव बाबा यांना महाराष्ट्र सरकारने झटका दिला आहे. राजस्थान सरकारपाठोपाठ महाराष्ट्र सरकारनेही पतंजलीच्या ‘कोरोनिल’ या औषधाला राज्यात बंदी घातली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टि्वट करत याची माहिती दिली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत ट्विट करुन याची माहिती दिली आहे. जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने क्लिनिकल ट्रायल घेतली का , याची माहिती घेण्यात येईल, हे सांगतानाच त्यांनी बनावट औषधांना महाराष्ट्रात विक्रीस परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

तर दुसरीकडे, राजस्थान सरकारने रामदेव बाबांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. तर उत्तराखंड सरकारनेही पतंजलीला नोटीस बजावली आहे. कोरोनाच्या उपचारासाठी आयुर्वेदिक औषध तयार करण्याची परवानगी कोठून मिळाली, अशी विचारणा केली आहे.
दरम्यान, राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी रामदेव बाबा यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, जर त्यांचे औषध राजस्थानात विकत असल्याचे आढळल्यास त्याच दिवशी ते तुरुंगात असतील.