राज ठाकरे यांचा ड्रायवर निघाला कोरोना पॉझिटिव्ह…..!
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे दोन्ही वाहनचालक कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. आता त्या दोघा वाहनचालकांवर सध्या मुंबईतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या काही शासकीय सुरक्षा रक्षकांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी ‘कोरोना’वर यशस्वी मातही केली. सुरक्षा रक्षकांनी ‘कृष्णकुंज’च्या दारातच कोरोनाला रोखल्याचं बोललं जात होतं.


तर दुसरीकडे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून काल डिस्चार्ज देण्यात आला. दोन दिवसांपूर्वी त्यांची दुसरी कोरोना टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला. मात्र नियमानुसार पुढील 14 दिवस धनंजय मुंडे यांना होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. धनंजय मुंडे यांना अकरा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
धनंजय मुंडे यांच्यासोबत कोरोनाची लागण झालेले त्यांचे खाजगी सचिव, एक स्वीय सहाय्यक, दोन वाहन चालक, एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर एक अंगरक्षक आणि एक कुक असे दोघे रुग्णालयात उपचार घेत आहेत