राज्यात १२ हजार २९६ कोरोनाबाधित; दिवसभरात ७९० रुग्ण, तर ३६ मृत्यू

0
147

ग्लोबल न्यूज – दिलासादायक बाब म्हणजे आज 121 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आतापर्यंत एकूण 2000 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आज कोरोनाच्या 790 नवीन रुग्णांची नोंद झाली. एकट्या मुंबईत 559 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 12,296 झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

आज 36 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमधील 27, पुणे शहरातील 3, अमरावती शहरातील 2, तर वसई विरारमधील 1, अमरावती जिल्ह्यामधील 1 तर औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील 1 जण आहे. याशिवाय पश्चिम बंगालमधील एका जणाचा मुंबईत मृत्यू झाला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज झालेल्या मृत्यूंपैकी 28 पुरुष आहेत तर 8 महिला आहेत. आज झालेल्या 36 मृत्यूपैकी 60 वर्षे किंव त्यावरील 19 रुग्ण आहेत. तर 16 रुग्ण हे 40 ते 59 वयोगटातील आहेत. तर एक जण 40 वर्षांखालील आहे. यापैकी 3 जणांना इतर आजारांबद्दलची माहिती मिळाली नाही. तर उर्वरित 33 जणांपैकी 23 जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.