राज्यात कोरोनाचा कहर सुरूच; बधितांचा आकडा 20 हजारांच्या पुढे

0
22

मुंबई: : राज्यात कोरोगानाग्रस्तांचा आकडा 20,000 पार गेला आहे. आतापर्यंत 3800 कोरोनाबाधित रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात येणार आहे, तर आतापर्यंत 779 जणांचा बळी गेला आहे. आज दिवसभरात राज्यात 48 मृत्यूंची नोंद झाली. यात सर्वाधिक मृत्यू मुंबईत झाले आहेत.

राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 20228 झाली आहे. आज 1165 नवीन रुग्णांचं निदान झाले आहे. राज्यात आज 330 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आजपर्यंत राज्यात 2,27,804 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत त्यातले 20,228 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यभरात 2,41,290 लोक होम क्वारंटाइमध्ये असून 13,976 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात 48 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मालेगाव शहरात आज 8 मृत्यू नोंदले गेले असले तरी ते 25 एप्रिल ते 8 मे या कालावधीत झालेले आहेत. उर्वरित मृतांच्या संख्येत मुंबईमधील 27, पुण्यातील 9, पुणे जिल्ह्यात 1, अकोला शहरात 1, नांदेड शहरात 1 तर अमरावती शहरात 1 मृत्यू झाला आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1243 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 55 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: 12,864(489)

ठाणे: 110 (2)

ठाणे मनपा: 800 (८)

नवी मुंबई मनपा: 789 (4)

कल्याण डोंबिवली मनपा: 316 (3)

उल्हासनगर मनपा: 20

भिवंडी निजामपूर मनपा: 21 (2)

मीरा भाईंदर मनपा: 201 (2)

पालघर: 32 (2)

वसई विरार मनपा: 216 (9)

रायगड: 89 (1)

पनवेल मनपा: 137 (2)

ठाणे मंडळ एकूण: 15,595 (524)

नाशिक: 50

नाशिक मनपा: 73

मालेगाव मनपा: 472 (20)

अहमदनगर: 51 (2)

अहमदनगर मनपा: 09

धुळे: 8 (2)

धुळे मनपा: 42 (1)

जळगाव: 111 (12)

जळगाव मनपा: 22 (2)

नंदूरबार: 19 (1)

नाशिक मंडळ एकूण: 857 (40)

पुणे: 118 (5)

पुणे मनपा: 1975 (141)

पिंपरी चिंचवड मनपा: 132 (3)

सोलापूर: 6

सोलापूर मनपा: 184 (10)

सातारा: 98 (2)

पुणे मंडळ एकूण: 2513 (161)

कोल्हापूर: 13 (1)

कोल्हापूर मनपा: 6

सांगली: 32

सांगली मिरज कुपवाड मनपा: 3 (1)

सिंधुदुर्ग: 5

रत्नागिरी: 18 (1)

कोल्हापूर मंडळ एकूण: 77 (3)

औरंगाबाद: 5

औरंगाबाद मनपा: 437 (12)

जालना: 12

हिंगोली: 58

परभणी: 1 (1)

परभणी मनपा: 1

औरंगाबाद मंडळ एकूण: 514 (13)

लातूर: 25 (1)

लातूर मनपा: 0

उस्मानाबाद: 3

बीड: 1

नांदेड: 3

नांदेड मनपा: 30 (3)

लातूर मंडळ एकूण: 62 (4)

अकोला: 9 (1)

अकोला मनपा: 134 (10)

अमरावती: 4 (1)

अमरावती मनपा: 78 (11)

यवतमाळ: 95

बुलढाणा: 24 (1)

वाशिम: 1

अकोला मंडळ एकूण: 345 (24)

नागपूर: 2

नागपूर मनपा: 222 (2)

वर्धा: 0

भंडारा: 1

गोंदिया: 1

चंद्रपूर: 1

चंद्रपूर मनपा: 3

गडचिरोली: 0

नागपूर मंडळ एकूण: 230 (2)

इतर राज्ये: 35 (8)

एकूण: 20 हजार 228 (779)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1243 कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 12 हजार 388 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 55 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.