ग्लोबल न्यूज: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीतील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रकल्पांना भेट दिली. देशी गोवंश अनुवंश सुधार प्रकल्प हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. शेतकऱ्यांसाठी गिर, साहिवाल, खिलार, पंढरपुरी, मुर्रा म्हैस या देशी जनावरांसंबंधी संशोधन कार्य येथे होतं.

ट्रस्टने राष्ट्रीय कृषी योजना आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नांनी उभारलेल्या डेअरी प्रकल्पामार्फत दुधाची, रक्ताची तपासणी, चाऱ्याची तपासणी तसंच पशुपालनाचं प्रशिक्षण दिलं जातं. शेण, गोमूत्र आणि दुधावर मूल्य संवर्धन प्रक्रिया केंद्रही येथे उभारलं जात आहे.
नेदरलँडच्या तंत्रज्ञानावर आधारलेल्या भाजीपाला गुणवत्ता केंद्रालाही आम्ही भेट दिली. ही उत्तम वाणाची रोगप्रतिकारशक्ती असलेली भाजीपाल्याची रोपं ना नफा ना तोट तत्त्वावर शेतकऱ्यांना विकली जातात. या रोपांमार्फत अधिक उत्पादन काढण्यासंबंधी कन्सल्टन्सीही येथे केली जाते.

एवढंच नाही तर झालेल्या उत्पादनाचं ग्रेडिंग करून निर्यात वा स्थानिक बाजारपेठेत विक्रीव्यवस्थेचं मार्गदर्शनही केलं जातं. राज्यभरातील शेतकरी इथल्या प्रशिक्षणाचा लाभ घेतात.
ब्राझिलच्या जातीपासून एम्ब्रियोमार्फत तयार केलेल्या कालवड प्रकल्पालाही भेट दिली. तसंच नेदरलँडशी सामंजस्य करार असलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी अभ्यासक्रम राबवणाऱ्या ॲग्रीकल्चरल कॉलेजलाही भेट दिली.

त्याचप्रमाणे नीती आयोगामार्फतच्या इनोव्हेशन सेंटरच्या प्रकल्पाची माहिती घेतली. फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन व कृषी क्षेत्रातले नवउद्योजक यांना या सेंटरमार्फत मार्गदर्शन केलं जातं.
या प्रकल्पांना आणि नेदरलँडशी सामंजस्य करार असलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी अभ्यासक्रम राबवणाऱ्या अॅग्रीकल्चरल कॉलेजलाही राजून शेट्टी यांनी भेट दिली. नीती आयोगामार्फतच्या इनोव्हेशन सेंटरच्या प्रकल्पाची त्यांनी माहिती घेतली. येथे फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन व कृषी क्षेत्रातले नवउद्योजक यांना या सेंटरमार्फत मार्गदर्शन केलं जातं. या ठिकाणी सुरु असलेले शेती विकासाचे काम पाहून राजू शेट्टी प्रभावित झाले होते.


राज्यपाल नियुक्त 12 जागांची निवड होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या कोट्यातील 4 पैकी एक जागा राजू शेट्टींना देण्याच्या तयारीत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान ठरल्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानीला विधानपरिषदेची एक जागा देणार आहे. त्याबाबतच जयंत पाटील आणि राजू शेट्टी यांच्यात चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
विधानपरिषद निवडणूक
महाराष्ट्रातील विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या 12 जागा रिकाम्या होत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या वाट्याला 4 जागा येणार आहेत. काँग्रेस आपल्या राजकीय नेत्याला राज्यपाल निर्देशित उमेदवारी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे
Supriya Sule Raju Shetti #Baramati