राऊत साहेब मी “सामनात” येऊन तुमच्या पाया पडेल…!
अभिनेता सोनू सूदने परप्रांतीयांना घरी जाण्यास मदत केल्याच्या कामगिरीवर सामनाच्या अग्रलेखातून राऊतांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत जोरदार टीका केली होती. यानंतर राजकीय वातावरण चांगले तापले होते. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला. जर आपण कोरोना रुग्णांना दिलासा देण्याचे काम केलात, तर मी स्वत: सामना प्रेसवर येऊन तुमच्या पाया पडायला तयार आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले आहे.

राऊतसाहेब सध्या महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. एकतर आपल्या टेस्ट होत नाही. टेस्ट झाल्या तर रुग्णवाहिका मिळत नाही. रुग्णवाहिका मिळाली तर सरकारी रुग्णालयात जागा मिळत नाही. सरकारी रुग्णालयात जागा मिळाली नाही आणि जागा मिळाली तर सरकारी रुग्णालयांची परिस्थिती वाईट आहे.

प्रायव्हेटवाले वाटेल ते बील आकारत आहे, अशी सध्या रुग्णांची अवस्था आहे. मला असं वाटतं आपण ही रुग्णांची अवस्था सुधारली तर आपणही सोनू सूदसारखे प्रसिद्ध होऊ शकता.
सर्वात महत्त्वाचे जर आपणही या रुग्णांना दिलासा देण्याचे काम जर केलं, तर मी स्वत: सामना प्रेसवर येऊन तुमच्या पाया पडायला तयार आहे* असे संदीप देशपांडे यांनी व्हिडीओत म्हटले आहेत.