आमची बांधिलकी जनतेशी, विखेनी लगावला राऊतांना टोला
राऊतांची छाती फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे, शरद पवार दोघेही दिसतील`
शिवसेना खासदार संजय राऊत रोज सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर आणि भाजपा नेत्यावर जोरदार आरोप लावताच असतात आता त्यांनीं काँग्रेसचे माजी विरोधीपक्ष नेते ताथ भाजपा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आरोप लगावला आहे. त्यांच्या या आरोपाला विखेनी जोरदार टोला लगावला आहे.


माझ्या घराण्याने भरभरून देण्याचे काम नगर मधील जनतेने केले आहे. आमची बांधीलकी त्या जनतेशी आहे. आमची बांधीलकी कधी मातोश्री आणि कधी सिल्वर ओक अशी येरझाऱ्या मारत गेली नाही अशी टीका विखेंनी राऊतांवर केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी आमदार तथा भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर “थोरातांची कुरकुर नाहीच विखेंनी कुरकुर” असा जोरदार टोला राऊतांनी लगावला होता. या टोल्याला विखेंनी पत्राच्या स्वरूपात प्रतिउत्तर दिले आहे. या पात्रात विखे म्हणतात की, सामनाच्या अग्रलेखात माझ्या विषयी लेख लिहिल्याबद्दल राऊतांचे आभार, तुमच्या भाषेत सांगायचे झाले तर सध्या मी वनवासात आहे.असा टोला सुद्धा विखेंनी हाणला आहे.
या टीकेला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी पत्रक प्रसिद्ध करून प्रत्युत्तर दिले. यामध्ये विखे-पाटील यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे. संजय राऊत यांनी आज शिवसेनेचे प्रवक्तेपद सोडून काँग्रेस समितीचे प्रवक्तेपद स्वीकारले आहे का? आम्ही राजकीय पक्ष बदलले पण ज्या पक्षात राहिलो त्याचे काम निष्ठेने केले. आमची छाती फाडून पाहिली तर एकावेळी एकच नेता दिसेल.
पण तुमची (संजय राऊत) छाती फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील. तुमचा हा बेगडीपणा एव्हान लोकांच्या लक्षात आला आहे. एकीकडे राजभवनाबद्दल धमकीवजा भाषा वापरायची आणि दुसरीकडे वाकून, लवून कुर्निसात करायचा हे कोलांटीउडीचे डोंबारी राजकारण आपण किती सहजगत्या करता हे अलीकडे महाराष्ट्राने बघितल्याचे विखे-पाटील यांनी म्हटले आहे.