रविवारी बार्शीत 3 कोरोना रुग्णांची वाढ; ग्रामीण जिल्ह्यात 17 ची भर

0
385

ग्लोबल न्यूज: सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्हा आरोग्य विभागाने रविवारी दुपारी जाहीर केलेल्या अहवालात सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात नव्याने 17 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे.या बाधित रुग्णामध्ये 8 पुरुष, 9 स्त्रियांचा समावेश आहे.

आतापर्यंत 11 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.तर 76 रुग्ण बरे होऊन घरी गेली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 196 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 109 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी रविवारी दिली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पॉझिटिव्ह रुग्णामध्ये मोहोळ तालुका क्रांतीनगर 1, कुंभारी दक्षिण सोलापूर 2, मुळेगाव पारधी वस्ती 6, पाथरी तालुका उत्तर सोलापूर एक, कसबा पेठ बार्शी एक, उपळाई ठेंगे तालुका बार्शी एक, शिवाजी नगर बार्शी एक या याठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळली आहे. आज 65 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 17 पॉझिटीव्ह तर 48 अहवाल निगेटिव्ह आले.

अद्याप 42 अहवाल प्रलंबित आहेत. 196 रुग्णांपैकी 120 पुरुष 76 स्त्री आहेत. तालुक्यात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 76 जण बरे होऊन घरी गेली आहेत.

कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे

अक्कलकोट – 30
बार्शी -30
माढा- 7
माळशिरस – 5
मोहोळ- 10
उत्तर सोलापूर – 13
सांगोला – 3
पंढरपूर – 7
दक्षिण सोलापूर – 91
एकूण -196

होम क्वांरटाईन – 2342

आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 2674
प्राप्त अहवाल- 2632
प्रलंबित अहवाल- 42

एकूण निगेटिव्ह – 2437
कोरोनाबाधितांची संख्या- 196
रुग्णालयात दाखल – 109
आतापर्यंत बरे – 76
मृत – 11

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here