
या मराठी अभिनेत्रीने लॉक डाऊनमध्ये उरकला आपला साखरपुडा
सुरज गायकवाड
ग्लोबल न्यूज: अनेक चित्रपटातुन आपल्या कलेची छाप पाडणारी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने घाईगडबडीत आपला साखरपुढा उरकला आहे. या साखपुड्याची माहिती सोनाली कुलकर्णी हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली आहे.

या बातमीनानंतर सर्व स्थराटीन अभिनंदनाचा वर्षाव या जोडीवर होताना दिसत आहे. दुबईमध्ये राहणा-या कुणाल बेनोडेकर याच्याशी 2 फेब्रुवारीला सोनालीचा साखरपुडा झाला. याची अधिकृत घोषणा सोनालीने आज सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
गेले अनेक दिवस सोनाली कुलकर्णीच्या प्रेमप्रकरणाविषयी चर्चा सुरु होती. मात्र अखेर तिने तिच्या लाईफ पार्टनरविषयी माहिती दिली आहे. ‘आमचा 2 फेब्रुवारी 2020 ला साखरपुडा झाला आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं…आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या,’ अशी फेसबुक पोस्ट सोनालीने लिहिली आहे.

तसेच आता चाहत्यांना उत्सुकता आहे ती तिच्या लग्नाची. कुणालने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड सोशल सायन्स इथून आपले शिक्षण पूर्ण केले असून, तो लंडनचा रहिवासी आहे. दरम्यान, ‘माझ्या पार्टनरसोबत एका नव्या प्रवासाला सुरुवात करतेय. चढ-उतार आणि साहसासाठी सज्ज आहे, असं सोनालीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. त्या पोस्टमध्ये तिने कुणालला टॅगही केलं होतं.
