‘या’ बहादुराला गृहमंत्री म्हणून माझाही महासॅल्यूट, अनिल देशमुखांकडून नाईक प्रशांत यांच कौतुक

  0
  26

  मुंबई । गेट वे ऑफ इंडियाहून अलिबागला जाताना अपघातग्रस्त झालेल्या प्रवासी बोटीतील 88 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या पोलिसाला गृहमंत्र्यांनी सॅल्यूट ठोकला आहे. अनिल देशमुख यांनी मांडवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रशांत घरत यांचं जाहीर कौतुक केलं.

   पोलीस नाईक प्रशांत घरत यांनी प्रसंगावधान राखत केलेल्या कामगिरीमुळे अलिबागला जाणाऱ्या लाँचमधील 88 प्रवाशांचे प्राण वाचले. अवघ्या महाराष्ट्राच्या कौतुकाला पात्र ठरलेल्या या बहादुराला गृहमंत्री म्हणून माझाही महासॅल्यूट असं अनिल देशमुख यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  दरम्यान, मांडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल सकाळी 10:15 वाजेच्या सुमारास गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टी या दरम्यान चालणारी अजिंठा प्रवासी बोट अचानक बुडू लागल्याने बोटीत बसलेल्या 88 प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. सुदैवाने सागरी गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची बोट जवळच असल्याने त्यांनी नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. या बोटीत तब्बल 88 प्रवाशी असल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. पोलिसांनी सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

  माहितीनुसार गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टी या दरम्यान अजिंठा प्रवासी बोट 88 प्रवाशांना घेऊन निघाली होती. बोट मध्ये प्रवासी जास्त असल्याच्या कारणाने अचानक बोट बुडू लागली. त्या वेळेस बोटवर असलेल्या प्रवाशी महिला, पुरूष, आणि लहान मुले यांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली.

  जवळच पोलीस गस्तीवर असणारी पोलीस कर्मचाऱ्यांची सद्गुरू कृपा ही बोट असल्याने पोलिसांनी घटनास्थळी बोट वळवली आणि बोटीत अडकलेल्या 88 प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून सुखरूप बाहेर काढले.

  किनाऱ्यावर आलेल्या सर्व प्रवाशी नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. तसेच आपला जीव धोक्यात घालून दाखवलेल्या धाडसाचे सुद्धा कौतुक केले. रायगड जिल्हा पोलीस दलातील सागरी सुरक्षा दल नेहमीच कार्यतत्पर असल्याची प्रचिती काल या घटनेवरून पुन्हा एकदा दिसून आली आहे.