या दिग्गज कलाकाराने केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक म्हणाले सॅल्युट..

0
51

मुंबई:राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून रोज निर्णय घेतले जातात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार फेसबुकवरुन संवाद साधत लोकांना संयम राखण्याचं आवाहन करत महत्त्वाचे निर्णय आणि सूचनांची माहिती देत आहेत. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील त्याच पद्धतीने काम करीत आहेत.उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने शात पणे आणि नियोजपूर्वक परिस्थिती हाताळत आहे त्याचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.

आता प्रसिद्ध गीतकार, पटकथा लेखक जावेद अख्तर यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कौतुकास पात्र असल्याचं सांगत त्यांना सलाम केला आहे. जावेद अख्तर यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचं कौतूक केलं आहे. ते म्हणाले,

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने कोरोना व्हायरसंबंधी स्पष्ट निर्देश देत परिस्थिती हाताळत आहे ते कौतुकास पात्र आहे. माझा सलाम, असं जावेद अख्तर म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने एकूणच परिस्थिती हाताळली आहे त्याबद्दल फक्त सर्वसामान्यच नाही तर सेलिब्रेटीही जाहीरपणे उद्धव ठाकरे यांचं कौतुक करत आहेत.विरोधी पक्ष देखील या कामावर समाधान व्यक्त करत आहे.