मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले ;वाचा कोण आहे आराध्या..

0
30

मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे
आराध्याचे कुटुंबिय भारावले

सोलापूर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्या कडूचे कुटुंबिय भारावून गेले. आराध्याने वाढदिवस साजरा न करता ते पैसे मुख्यमंत्री सहायता निधी आणि पीएम केअर्स निधीला दिले. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधतांना आराध्याचे कौतुक केले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आराध्या अजय कडू हीने वाढदिवसासाठी खर्च करण्यात येणारे 10 हजार रुपये कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी दिले. तीच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज कौतुक केले. आराध्या ही बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर अजय कडू यांची कन्या आहे. तीचा सातवा वाढदिवस काल होता. वाढदिवस साजरा न करता हे पैसे आपण मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहायता निधीला द्यायचे का, असे श्री. कडू यांनी आराध्या आणि मुलगा आर्यन यांना विचारले. यावर त्या दोघानीही पैसे द्या, असे लगेच सांगितले. त्यानुसार श्री. कडू यांनी काल पाच हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस आणि पाच हजार पीएम केअर्स फंडासासाठी जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्द केले.

आराध्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीत शिकते. बोलक्या स्वभावाची आराध्या स्केटींग उत्तम करते. आर्यन आठव्या इयत्तेत आहे. श्री. कडू मूळचे आमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे आहेत. श्री. कडू यांची नुकतीच झोनल मॅनेजर पदावर पदोन्नती झाली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आराध्याची दखल घेवून तीचे कौतुक केले, याबद्दल आम्ही सर्व कुटुंबिय अतिशय आभारी आहोत, असे श्री. अजय कडू यांनी सांगितले.