मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’बाहेरील 3 पोलिसांना झाली कोरोनाची लागण

0
142

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवास्थान असलेल्या मातोश्री बाहेरील कलानगर मुख्य गेटवरील तीन पोलिसांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.  या तीनही पोलिसांवर सध्या पुढील उपचार करण्यात येत आहेत.

पॉझिटिव्ह टेस्ट आलेल्या पोलिसांमध्ये कोणतीही लक्षणं दिसून आलेली नव्हती. मात्र खबरदारी म्हणून कला नगर परिसरातील सर्व पोलिसांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात येत आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या टेस्टमध्ये सर्व पोलिसांची टेस्ट निगेटिव्ह आली होती.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’बाहेरील 3 पोलिसांना झाली कोरोनाची लागण

विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र

या तिघांनाही सांताक्रूझमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. या पूर्वी मतोश्रीवर सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या 130 जणांच्या सिक्युरिटी स्टाफला क्वारंटाइन करण्यात आलं होतं. मातोश्री बाहेरील चहावालाही यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता.

https://barshilive.com/archives/1848

दरम्यान मुंबईत शुक्रवारी 751 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 7625 वर पोहोचला आहे. तर शुक्रवारी 5 मृत्यूंसह 295 मृत्यूसंख्या झाली आहे. मृतांमध्ये 3 पुरुष 2 महिलांचा समावेश आहे.