मुंबई लोकल बंद होणार की नाही? मुख्यमंत्र्यांनी दिलं अत्यंत महत्त्वाचं उत्तर 

  0
  24

  मुंबई लोकल बंद होणार की नाही? मुख्यमंत्र्यांनी दिलं अत्यंत महत्त्वाचं उत्तर 

  मुंबई: कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता राज्य सरकार, मुंबई लोकल, बस आणि मेट्रो या सार्वजनिक दळणवळण सेवा बंद करणार असल्याची आज (मंगळवार) दिवसभर जोरदार चर्चा सुरू होती. आज बराच वेळ राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं की, ‘लोकल ट्रेन किंवा बस बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही.’ त्यामुळे पुढचे काही दिवस तरी लोकल, बस आणि मेट्रो सुरु राहणार आहे.

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठक झाल्या नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले,घरूनच काम करण्याच्या आवाहनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.जनतेला कोरोनाच्या प्रादुर्भावाचे गांभर्य समजले असून जनता सहकार्य करेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून व्यक्तजीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरूच ठेवणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


  लोकल, बस आणि मेट्रोतील गर्दी ओसली नाही, तर सरकारला कठोर पावले उचलावी लागतील.जनतेच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.लोकल, बस, मेट्रो सेवा बंद केल्यास काही लोकांच्या उदरनिर्वाहाची समस्या निर्माण होईलगर्दी कमी करण्यासाठी जनतेनेच काळजी घ्यावी
  सरकारी कार्यालयांना सुट्टी दिलेली नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले स्पष्ट केल.

  खासगी कार्यालयातील कर्मचारी 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची गरज.विलिगीकरण केलेल्या रुग्णांनी अधिक जबाबदारीने वागण्याचे मुख्यमंत्र्याचे आवाहन कोरोनाच प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

  सर्वधर्मियांनी पुढाकार घेत प्रार्थनास्थळी गर्दी टाळावी
  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आगामी 15 दिवस महत्त्वाचे, जनतेने जबाबदारीने वागावे. कठोर पावले उचलण्याची सरकारची इच्छा नाही, मात्र, जनतेने स्वंयशिस्त पाळावी.गर्दी टाळण्यासाठी जनतेला सातत्याने आवाहन करण्यात येत आहे.

  जनतेने स्वतःहून गर्दी टाळण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन मुंबईतील लोकलसेवा बंद करण्याचा कोणताही निर्णय नाही- मुख्यमंत्र्यांची माहिती राज्यातील 40 रुग्णांपैकी एकाची प्रकृती गंभी, इतरांची प्रकृती स्थिर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील कोरोनाचा पादुर्भाव रोखण्याबाबत चर्चा करण्यात आली.


  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सरकारी कार्यालये बंद ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व सरकारी आस्थापना बंद राहणार आहेत. पुढील सात दिवस सरकारी कार्यालये बंद राहतील असा निर्णय आज राज्य सरकारने घेतल आहे. यापूर्वी राज्यातील शाळा, कॉलेज, मॉल्स, जिम बंद 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आले होते.