मुंबई महानगरपालिका आयुक्त परदेशी सह आठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;हे असतील मुंबई चे आयुक्त

0
157

मुंबई: मुंबईतील वाढता कोरोनाचा कहर रोखण्यात म्हणावे तसे यश न आल्याने मुंबई मनपाचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची कोरोनाच्या कहरात तडकाफडकी बदली झाली आहे. सध्या राज्य सरकारचे नगर विकास विभाग (I) चे प्रधान सचिव आय.एस. चहल यांना मुंबई मानपास आयुक्तपद देण्यात आले आहे. परदेशी यांना नगरविकास विभाग (I) चे अतिरिक्त प्रधान सचिव पदावर पाठविण्यात आले आहे. 

मुंबईत कोरोनाचे संकट सतत वाढत आहे. तेव्हापासून परदेशीच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत होते. अखेर परदेशी यांना मुंबई मनपा आयुक्तपदावरून हटविण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला. 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

शुक्रवारी राज्य सरकारने आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सैनिक यांची वित्त विभागात अतिरिक्त मुख्य सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. किशोरराजे निंबाळकर यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवे सचिव करण्यात आल आहे. मुंबईचे अतिरिक्त आयुक्त मनपा ए. एल.जाराड मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असतील.

आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांना मुंबई मनपामधील अतिरिक्त मनपा आयुक्तपदावर पाठविण्यात आले आहे. जयस्वाल हे ठाणे मनपाचे आयुक्त राहिले आहेत. अश्विनी भिडे यांना मुंबई मानपामध्ये अतिरिक्त मनपा आयुक्त म्हणूनही नियुक्त करण्यात आले आहे. मुंबई राज्य मानपाच्या अतिरिक्त आयुक्त जयश्री भोज यांची महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.