मुंबईसह देशातील पाच शहरात गंभीर परिस्थिती, केंद्र सरकारची माहिती

0
66

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे, इंदूर, जयपूर, कोलकाता भागात परिस्थिती गंभीर आहे अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. कोरोनाशी लढणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांवर हल्ले होत आहे, त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईला त्याचा फटका बसेल असेही केंद्र सरकारने म्हटले आहे.

सोमवारी कोरोनाचे 543 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 17 हजार 265 इतकी झाली आहे. महाराष्ट्रात 4203 कोरोनाचे रुग्ण असून 223 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच मध्य प्रदेशमध्ये 1 हजार 407 रुग्ण असून 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

देशातील मुंबई, पुणे, इंदूर, जयपूर आणि कोलकातामध्ये गंभीर परिस्थिती आहे. इथली माहिती घेण्यासाठी केंद सरकारने काही सहा पथकं स्थापन केली आहेत. ही पथकं महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.