मुंबईत 1566 कोरोनाबाधित, 40 जणांचा मृत्यू! एकूण रुग्णसंख्या 28 हजार 634 वर

0
149

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असून शनिवारी नवीन 1566 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील एकूण कोरोनारुग्णांची संख्या 28 हजार 634 वर पोहोचली आहे. तर एकूण मृतांची संख्या 949 झाली आहे.

मुंबईत शनिवारी नोंद झालेल्या 1566 रुग्णांमध्ये 19 ते 21 मे या कालावधीत झालेल्या 292 कोरोना चाचण्यांमधून पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांचा समावेश असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईत आज पालिकेसह विविध रुग्णालयांत 1059 कोरोना संशयित भरती झाले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

गेल्या एकाच दिवसांत झालेल्या 40 मृतांमध्ये 25 पुरुष आणि 15 महिलांचा समावेश आहे. यातील 22 मृतांना काही दीर्घकालीन आजार होते. तर चार रुग्णांचे वर 40 वर्षांखाली तर 21 रुग्णांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त होते आणि 15 रुग्ण 40 ते 60 वर्षे वयोगटातील होते. दरम्यान, मुंबईत गेल्या एकाच दिवसांत 396 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्याही 7476 वर पोहोचली आहे.

पालिकेने केल्या 16 लाखांवर कोरोना चाचण्या

मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रभाव सुरू झाल्यानंतर पालिकेने 22 मेपर्यंत तब्बल 16 लाख 4 हजार 671 कोरोना चाचण्या केल्या आहेत. सात शासकीय व पालिका प्रयोगशाळा, 13 खासगी प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या केल्या असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.

583 रुग्ण आयसीयूत, 197 व्हेंटिलेटरवर!

– सद्यस्थितीत पालिका आणि शासकीय रुग्णालयांमध्ये 4056, खासगी रुग्णालयांमध्ये 1336 अशा एकूणा 5392 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात 583 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून 197 जण व्हेंटिलेटरवर आहेत. शिवाय कोरोना केअर सेंटर – 2 मध्ये 3658 रुग्ण दाखल करण्यात आले आहेत.

– मुंबईत सध्या 659 कंटेनमेंट झोन असून 2411 सक्रिय इमारती सील करण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत पालिकेच्या माध्यमातून 7395 क्लोज काँटॅक्टमधील अति जोखमीच्या संशयितांचा शोध घेण्यात आला आहे. तर कमी जोखमीच्या 15686जणांचा शोध घेण्यात आला आहे