मुंबईत ९५० हुन अधिक मृत्यू का दडवले, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र….!

0
396

मुंबईत ९५० हुन अधिक मृत्यू का दडवले, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र….!

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत. आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील ९५० हून अधिक कोरोना मृत्यू का दडविण्यात आले, इतके अक्षम्य दुर्लक्ष का आणि असे करणार्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार, असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात ते म्हणतात की, सुमारे ९५० हून अधिक कोरोना बळी न दाखविता ते लपवून ठेवणे ही एक अतिशय गंभीर बाब आहे. मुंबईच्या दृष्टीने विचार केला तर हा संपूर्ण प्रकार अतिशय जीवघेणा आणि अतिशय धोकादायक आहे. कोरोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिकेने गठीत केलेल्या ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे जाते. या समितीने प्रत्येक प्रकरणावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो मृत्यू कोरोनामुळे झाला, असे जाहीर केले जाते. आता दरम्यानच्या काळात सुमारे ४५१ अशी प्रकरणे आहेत, ज्यांचे मृत्यू कोरोनामुळे झाले. तथापि ‘डेथ ऑडिट कमिटी’ने ती प्रकरणे नॉन-कोविड केली.

आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे हे सर्व मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत. आता ही बाब उघडकीस आली आहे. इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बळी न दाखविण्याचे काम ‘डेथ ऑडिट कमिटी’ने कुणाच्या दबावात केले. या कमिटीवर काय कारवाई राज्य सरकारच्या वतीने केली जाणार आहे, असे सारेच प्रश्न निर्माण होत आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here