मुंबईत दुपारी ३ ऐवजी एक ते दीड वाजताच ‘निसर्ग’ चक्रीवादळ धडकणार, हवामान खात्याची माहिती….!

0
410

मुंबईत दुपारी ३ ऐवजी एक ते दीड वाजताच ‘निसर्ग’ चक्रीवादळ धडकणार, हवामान खात्याची माहिती….!

एकीकडे महाराष्ट्र कोरोना संकटाचा सामना करत आहे तर दुसरीकडे राज्यावर नैसर्गिक संकट ओढावले आहे. कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रावर निसर्ग नावाचे चक्रीवादळ धडकणार आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीला बसणार आहे. हे चक्रीवादळ धडकण्यापूर्वी राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने घोंघावत येत आहे. आज हे वादळ अलिबाग समुद्र किनाऱ्यावर धडकणार आहे.मुंबईलाही त्याचा तडाखा बसणार आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आज मुंबईतील विमानांची ये-जा काही प्रमाणात रद्द करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनेट विमानतळावर आज केवळ १९ विमानांचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी ११ उड्डाणे मुंबईहून होतील, तर ८ विमाने मुंबईत दाखल होतील. तर मुंबई विमानतळावर आज केवळ ५ विमान कंपन्यांना विमान उड्डाणाची परवानगी देण्यात आली आहे. यात एअर आशिया इंडिया, एअर इंडिया, इंडिगो, गोएयर आणि स्पाईस जेटचा समावेश आहे. दरम्यान, आज मुंबईहून देशाच्या केवळ १० भागांकडे विमान उड्डाणे होणार आहेत.

ताशी १३ किलोमीटर वेगाने हे वादळ पुढे सरकत असून ते जमिनीवर धडकताना ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, वादळ मुंबईच्या दिशेने वेगाने सरकत असून पहाटे पाच वाजता मुंबईपासून हे वादळ २५० तर अलिबागपासून २०० किलोमीटर अंतरावर होते. त्यानंतर साडेसहा वाजताच्या स्थितीनुसार वादळ मुंबईपासून २०० व अलिबागपासून १५५ किमी अंतरावर आणि साडेसात वाजता हे अंतर अनुक्रमे १९० आणि १४० किमी इतकं कमी झाल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur