मिशन बिगिनचा तिसरा टप्पा आजपासून सुरु… वाचा आजपासून कोणत्या नियमांमध्ये शिथिलता…

0
431

मिशन बिगिनचा तिसरा टप्पा आजपासून सुरु… वाचा आजपासून कोणत्या नियमांमध्ये शिथिलता…

ग्लोबल न्युज: मिशन बिगिनचा तिसरा टप्पा आजपासून सुरु झालाय. पुनश्च हरीओम या अभियानांतर्गत राज्य सरकारने शासनाने टप्प्या टप्प्याने लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार आजपासून तिसरा टप्पा सुरू झालाय. यामध्ये खासगी कार्यालये तसेच सार्वजनिक दळणवळण सेवा सुरू होणार आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सर्व दुकाने, मार्केटस् हे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. बेस्ट बसही आजपासून सुरु होणारे. त्यासोबतच सार्वजनिक दळणवळण सेवा सुरू होणार आहे.
1 जूनपासून राज्यात ‘मिशन बिगीन अगेन’ला सुरुवात झाली. तर शनिवारपासून राज्यभरात या मिशनचा दुसरा टप्पा सुरु झालाय. राज्य सरकारनं शुक्रवारपासून काही अटींवर दुकानं सुरू करण्याची परवानगी दिलीय.

राज्यात आजपासून काय सुरू होणार ?

 • आजपासून खासगी कार्यालयं सुरु
 • खासगी कार्यालयात 10% उपस्थिती
 • मुंबईत आजपासून दुकानं सुरु
 • सम-विषम तारखेनुसार दुकानं सुरु
 • आजपासून मुंबईत बेस्ट बस सुरु
 • एका सीटवर एकाच प्रवाशाला मुभा
 • 5 प्रवासी उभ्यानं प्रवास करु शकणार
 • सोशल डिस्टन्सिंगचे नियम सक्तीचं
 • उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी आणि ऑनलाईन शिक्षणासाठी शाळा आजपासून सुरू

या ठिकाणी बंदी कायम –

 • विद्यार्थ्यांसाठी शाळा, कॉलेज, शैक्षणिक ट्रेनिंग सेंटर, कोचिंग क्लासेस बंद राहणार
 • आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार
 • मेट्रो, लोकलसेवा बंद राहणार
 • स्विमिंग पूल, जिम, सिनेमागृह, धार्मिक स्थळे, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार

धार्मिक स्थळांचं काय?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने पाचवा लॉकडाऊन तीस जूनपर्यंत वाढवला असला. तरी अनेक गोष्टी शिथिल करण्यासदेखील सुरुवात केलीय. त्याचाच भाग म्हणून आजपासून देशभरात मंदिर, मशिदी आणि सर्व प्रार्थनास्थळं खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे सकाळपासूनच प्रार्थनास्थळांमध्ये भाविकांची रीघ पाहायला मिळाली. मंदिरं खुली झाली असली, तरी नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगसह अनेक नियमांचंदेखील पालन करावं लागणार आहे. मंदिरात येण्यापूर्वी पत्येकाने हात पाय धुणे बंधनकारक करण्यात आलंय. शिवाय मूर्तीला स्पर्श करण्यात देखील मनाई करण्यात आलीय. तसंच मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाने सतरंजी वा आसन आणावे. आणि एकत्र जमून भजने, आरत्या म्हणण्यास मनाई कायम आहे.

देशभरात मंदिरांसह मशिदी, गुरूद्वारे आणि चर्चही भाविकांसाठी खुले करण्यात आलेत. तब्बल अडीच महिन्यानंतर मस्जिदमध्ये मुस्लिम बांधवांना नमाज अदा करता येणार आहे. त्याचबरोबर सिख बांधवही गुरूद्वारांमध्ये मोठ्या संख्येनं येताना दिसतायत. सर्वच ठिकाणी सोशल डिस्टंसिंग आणि सरकारनं घालून दिलेले नियम पाळले जातायत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur