माजी मुख्यमंत्र्याला कोरोनाची लागण ; वाचा सविस्तर-
ग्लोबल न्यूज: सध्या जागापाठोपाठ भारतात सुद्धा कोरोना आपले हात पाय पसरले आहेत. आज चीनच्या बरोबरीने महाराष्ट्रात आणि गुजरात राज्यात कोरोनाने मोठया प्रमाणात शिरकाव केला आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या तीन तीन नेत्यांना कोरोनाची लागण झालेली असतानाच गुजरात राज्याच्या माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह निघाली आहे. त्यांना सध्या घरातच त्यांना देखरेखेखाली विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांचे जनसंपर्क प्रमुख प्रथेश पटेल यांनी ही माहिती दिली आहे. शंकरसिंह वाघेला यांना गेल्या तीन दिवसांपासून ताप येत होता. ज्यानंतर त्यांची करोना चाचणी करण्यात आली. जी पॉझिटिव्ह आली आहे. ज्यानंतर त्यांना त्यांच्या गांधीनगर येथील निवासस्थानी गृह विलिगीकरणात ठेवण्यात आलं आहे असंही पटेल यांनी स्पष्ट केलं. इंडियन एक्स्प्रेसला त्यांनी माहिती दिली.

समर्थकांमधील ‘बापू’ या नावाने लोकप्रिय असलेल्या वाघेला हे 1996 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्याच वेळी, आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाघेला यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्हला आल्यानंतर आणि परिस्थिती जाणून घेतली शंकरसिंग वाघेला यांना फोनवर संपर्क साधून धीर दिला.

गुजरातमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत
दरम्यान, देशाच्या विविध भागात कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. गुजरातमध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची एक टीम शुक्रवारी अहमदाबादला भेट देण्यासाठी आली. या पथकाचे नेतृत्व आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल हे होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयामार्फत अनेक राज्यांत चमू सतत पाठविल्या जात आहेत, ज्यामुळे जमीनीतील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. शुक्रवारी लव्ह अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली पथक अहमदाबादला पोहोचले, घाटलोडिया परिसराला भेट दिली आणि डॉक्टर, सामान्य लोकांशी संवाद साधला.