महाराष्ट्रात 15 जून पासून शाळा चालू करण्याचा विचार – वर्षाताई गायकवाड

0
190

महाराष्ट्रात 15 जून पासून शाळा चालू करण्याचा विचार – वर्षाताई गायकवाड

ग्लोबल न्यूज: राज्यात करोनाच्या वाढत्या संकटात शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र अशात आता १५ जून पासून शाळा सुरु करून शैक्षणिक वर्षाला सुरवात करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे असे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. महाराष्ट्रात शाळा सुरु झाल्यानंतर आठवड्यातले ४८ तास त्या सुरु ठेवल्या जातील. म्हणजे शनिवार-रविवार अशी सुट्टी देणाऱ्या शाळांना ती मुभा नसेल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सध्या देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु आहे. अशात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि १५ इतर प्रमुख शहरं ही रेड झोन मध्ये आहेत. मात्र हळूहळू शाळा सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करतं आहे असं वर्षा गायकवाड यांनी इंडियन एक्स्प्रेसला या वृत्तपत्र समूहाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

दोन शिफ्टमध्ये शाळा सुरु करण्याचा विचार आहे असे वर्षाताई गायकवाड यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. तसेच शाळांचे तास कमी करण्याचा विचार असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक असणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. शाळा सुरु करताना दोन पर्यांयाचा विचार सुरु आहे.

वाचा काय आहेत पर्याय

पर्याय १
विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑड आणि इव्हन नंबर प्रमाणे दोन शिफ्टमध्ये म्हणजे सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात बोलवायचं

पर्याय २
प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट करायचे दोन्ही गटांना एक दिवसाआड शाळेत बोलवायचं हा दुसरा पर्याय आहे
सध्या या दोन पर्यायांचा विचार राज्य सरकार करतं आहे. तसंच शाळा सुरु झाल्या तरीही एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल याची काळजी शाळांना घ्यायची आहे