भीती आणि द्वेषाच्या राजकारणाला बळी न पडता कुठल्या एका समाजाला दूर करू नका-मोहन भागवत

0
101

नागपूर : संपूर्ण जग करोनाशी लढा देत असताना काही शक्तींचा जनतेच्या मनामध्ये द्वेष आणि भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा खेळ सुरू आहे. ‘भारत तेरे तुकडे होंगे’ असे कुविचार पसरवणाऱ्यांचे हे कार्य आहे. त्यात राजकारणही केले जाते. परंतु, त्यांना करायचे ते करू द्या. अशांच्या भीती आणि द्वेषाच्या राजकारणाला आपण बळी न पडता कुठल्या एका समाजाला दूर करू नका. १३० कोटींचा हा संपूर्ण समाज आमचे बंधू आहे या भावनेतून सेवा करा, असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून रविवारी संघ स्वयंसेवक व जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, आपल्याला विलगीकरणामध्ये टाकतील म्हणून काही लोक लपून राहण्याचा प्रयत्न करतात. केवळ आमच्या समूहावर प्रतिबंध घातला जात आहे अशी भावना काही लोकांमध्ये आहे. त्यातून अनेक चुकीचे प्रकारही घडत आहे. करोनाचा संसर्ग वाढण्याला हेही एक कारण आहे. मात्र, संघानेही मार्चपासून जून शेवटपर्यंते सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. परंतु, काही शक्ती लोकांना भडकवण्याचे काम करीत आहे. अशा दुष्प्रचारामुळे  लोकांमध्ये क्रोध निर्माण होत आहे. परंतु, यामुळे अविवेक व अतिवादी कृत्य घडतात. याचा लाभ घेणाऱ्या काही शक्ती समाजामध्ये आहेत. या संकटकाळात आपल्या मनात भीती किंवा द्वेषाचा विचार न येऊ देता सकारात्मकतेने या सर्व संकटाला सामोरे जाणे आवश्यक आहे

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पालघरमध्ये झालेल्या दोन साधूंच्या हत्त्येवरही डॉ. भागवत यांनी चिंता व्यक्त केली. असे कृत्य होणे किंवा कायदा हातात घेणे योग्य आहे का? असा सवालही त्यांनी केला.  मानवतेचा प्रचार करणारे ते साधू होते. अशा घटनांमुळे आपल्या मनात वेगवेगळे विचार येऊ शकतात. मात्र, अशा संकटकाळात भय, द्वेषापासून दूर राहत सकारात्मकतेने समोर जावे असे आवाहनही त्यांनी केले.

विकासाची दृष्टी  बदलावी लागेल

करोनानंतर आम्हाला विकासाची दृष्टी बदलावी लागणार आहे. टाळेबंदीमुळे आज प्रदूषणाची पातळी कमी झाली. त्यामुळे यापुढे अनेक गोष्टींत बदल होणार असून स्वदेशी आणि पर्यावरणाला पोषक अशी नीती अवलंबवावी लागणार आहे. तसे निर्धारण करून सरकारलाही धोरण आखावे लागेल. स्वदेशीचे आचरण करण्यासह उद्योग उभे करावे लागतील. विदेशांवर अवलंबित न राहता स्वदेशीचा वापर करण्यावर आम्हाला स्वत:ला उभे राहावे लागेल. या संकटला संधी बनवून नवीन भारत निर्माण करावे लागेल, असेही सरसंघचालक म्हणाले.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात केंद्र सरकारने चांगलं काम केलं आहे. भारत सर्व जगाला औषधं पुरवित आहे. देशातले 130 कोटी लोक आपले आहेत, त्या सगळ्यांसाठी काम करायचं आहे असंही त्यांनी सांगितलं. अशा संकटाच्या काळात मनोधैर्य न खचू देता काम करावं असंही त्यांनी सांगितलं.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत लाखो स्वयंसेवक काम करत आहेत आणि पुढेही करत राहातील. जनतेने सरकारने सांगितलेल्या नियमांचं पालन केलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. या काळात राजकारण करू नका देशहिताला प्राधान्य द्या असं आवाहनही त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं.