भीतीदायक ! सोलापूर शहरात कोरोनाचे 90 नवे पॉझिटिव्ह, नऊ जणांचा मृत्यू 

0
549

भीतीदायक ! सोलापूर शहरात कोरोनाचे 90 नवे पॉझिटिव्ह, नऊ जणांचा मृत्यू 

सोलापूर महापालिकेच्या हद्दीत आज नव्याने 90 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 55 पुरुष तर तर 35 महिलांचा समावेश आहे. कोरोनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला.

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या हद्दीत आज नव्याने 90 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 55 पुरुष तर तर 35 महिलांचा समावेश आहे. कोरोनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. सापडलेल्या 90 कोरोनाबाधित रुग्णांमुळे सोलापूर शहर परिसरातील एकूण कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या 1844 झाली आहे. 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

महापालिका हद्दीतील 154 व्यक्तींचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवार पेठ परिसरातील 71 वर्षीय पुरुषाला 6 जून रोजी सीएनएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 18 जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दक्षिण कसबा परिसरातील 60 वर्षीय महिलेला 15 जून रोजी सीएनएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

18 जून रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास त्यांचे निधन झाले आहे. न्यू पाच्छा पेठ परिसरातील 67 वर्षीय पुरुषाला 10 जून रोजी सीएनएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान 17 जून रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. साखरपेठ परिसरातील साठ वर्षीय पुरुषाला 15 जून रोजी गंगामाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

18 जून रोजी सहाच्या दरम्यान त्यांचे निधन झाले आहे. एमआयडीसी परिसरातील 75 वर्षीय महिलेला 16 जून रोजी सीएनएस रुग्णालयात दाखल केले होते. 18 जून रोजी रात्री दीड वाजता त्यांचे निधन झाले आहे. पश्‍चिम मंगळवार पेठ परिसरातील 90 वर्षीय पुरुषाला 9 जून रोजी मार्कंडेय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 19 जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांचे निधन झाले आहे. उत्तर कसबा परिसरातील 75 वर्षीय महिलेला 8 जून रोजी सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. 18 जून रोजी त्यांचे निधन झाले आहे.

सम्राट चौक परिसरातील 74 वर्षीय पुरुषाला 10 जून रोजी सीएनएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 19 जून रोजी सायंकाळी साडेचार वाजता त्यांचे निधन झाले आहे. रविवार पेठ परिसरातील 70 वर्षीय महिलेला 15 जून रोजी मार्कंडेय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 19 जून रोजी दुपारी अडीच वाजता त्यांचे निधन झाले आहे. 

कोरोना चाचणीचा एकही अहवाल आता प्रलंबित नसून सर्वचे सर्व अहवाल तपासले आहेत. आज दिवसभरात 340 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 250 निगेटिव्ह आले आहेत तर 90 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

एकूण रुग्ण संख्या झाली 1844

शुक्रवारी 340 अहवाल  प्राप्त

  250 निगेटिव्ह
  90  पॉझिटिव्ह

प्रलंबित अहवाल 00

शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या 8 जणांना डिस्चार्ज

शुक्रवारी 9 जणांचा मृत्यू

आजतागायत 154 मृत्यू

आजतागायत  कोरोनामुक्त  झालेल्या  932 जणांना डिस्चार्ज

758 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here