भाजप आमदार गणेश नाईक मनपा आयुक्तांवर भडकले का ? वाचा……!

0
400

भाजप आमदार गणेश नाईक मनपा आयुक्तांवर भडकले का ? वाचा……!

भाजप आमदार गणेश नाईक यांनी बुधवारी वाशी येथील कोरोनाच्या रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरची पाहणी केली. यावेळी कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी उभारण्यात आलेला मंच, लाईट आणि खुर्च्या पाहून गणेश नाईक यांना राग अनावर झाला. त्यांनी संतापात नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना फोन करत याबाबत जाब विचारला.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

गणेश नाईक यांनी कॅमेरासमोर आयुक्तांशी फोनवर संभाषण केले. यावेळी ते आयुक्तांवर भडकले. त्यांच्या संभाषणाचा व्हिडीओ आता समोर आला आहे. पुढच्या आठ दिवसात वाशीचं हॉस्पिटल जनरल हॉस्पिटल नाही झाले तर महापालिका आयुक्तांना घेराव घालणार, असा इशारा गणेश नाईक यांनी यावेळी आयुक्तांना दिला.

कोरोना रुग्णांची संख्या नवी मुंबईतील सुद्धा दिवसेंदिवस वाढत असताना कोविड सेंटर उद्घाटनासाठी थांबलं आहे का? विशेष म्हणजे सध्याच्या परिस्थितीत उद्घाटनाचे विचार येतात तरी कसे? उद्घाटनासाठी खुर्च्या लागल्या आहेत. स्टेज बनत आहेत,

उद्घाटनाचा कसा विषय नाही? कोरोनामुळे लोकं मरत आहेत. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. तरीही तुम्हाला उद्घाटनाची पडली आहे? उद्घाटनाचं सुचतं कुणाला? तुम्ही हे सर्व बंद करा. उद्या तातडीने सर्व पेशंट इकडे शिफ्ट करा. लोकांची सोय करा. कोरोनामुळे लोकांचा जीव जात आहे. त्यामुळे लोकांवर उपचार करा. त्यानंतर तुम्ही उद्घाटन करा.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here