बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यास च्या अध्यक्षपदी या शिवसेना मंत्र्याची नियुक्ती

  0
  23

  बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यास च्या अध्यक्षपदी या शिवसेना मंत्र्याची नियुक्ती

  मुंबई: बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासाच्या अध्यक्षपदी शिवसेना नेते पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबईत भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  यासाठी शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याची निवड केली आहे. या स्मारकासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक न्यास आणि संस्था स्थापन केली होती.

  उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे अध्यक्षपद रिक्त झाले होते. त्यानंतर 13 मार्च 2020 रोजी या अध्यक्षपदी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे असे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.

  तर न्यासाच्या सदस्य सचिवपदी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची व शशिकांत प्रभू यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  या स्मारकासाठी शासकीय सार्वजनिक न्यास स्थापन करण्यात आला आहे. त्यानुसार 27 सप्टेंबर 2016 च्या शासन निर्णयानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक न्यास आणि संस्था स्थापन केली होती.”

  न्यासावरील अध्यक्ष आणि इतर सदस्यांचा प्रथम नियुक्तीचा तीन वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने पदसिध्द सदस्य वगळता अन्य सदस्यांची पदे भरण्याचे सरकारसमोर प्रस्तावित होते. त्यानुसार सरकारने नव्या नियुक्त्यांना मान्यता दिली

  या स्मारकासाठी लागणारा १०० कोटींचा खर्च सुरुवातीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने खर्च करायचा आहे.यासाठी निविदा ही मागविण्यात आल्या आहेत.