बार्शी पोलिस ठाण्यात ठेकेदाराचा चक्कर येऊन मृत्यु

0
102

बार्शी पोलिस ठाण्यात ठेकेदाराचा चक्कर येऊन मृत्यु

गणेश भोळे

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी : आपत्ती व्यवस्थापन कायदा व संचारबंदी सुरु असताना शहरातील निलाई शॉपींग , जिल्हा परिषद शाळा क्रमांक सहाच्या मागे सुरु असलेल्या बांधकामावर चार कामगार काम करत होते.
पोलिसांनी त्यांना पकडून आणल्यानंतर त्या कामगारांना भेटण्यास आलेल्या ठेकेदारास पोलिस ठाण्यातच चक्कर आली. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. बार्शी पोलिसांत अकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. तर चार कामगारांवर गुन्हा दाखल झाला आहे.

हेमंत पंढरीनाथ नडगिरे (वय ५७, रा. नागणे प्लॉट) असे मृत्यू झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे.

तर रामलायक हिरामन राम (वय ३४), सुरेश जुगनराम पासवान (वय ३८), सुनिलकुमार राजेंद्र राम (वय २६), शिवपुजन शंकर यादव (वय ३०, सर्व रा. बिहार, सध्या सोलापूर रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत हनुमंत पाडूळे यांनी फिर्याद दाखल केली.

अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असतानाही बार्शी येथे सदर ठिकाणी बांधकाम चालू होते. कामावर असणाऱ्या मजूरांच्या तोंडाला मास्क नव्हते, सोशल डिस्टन्सिंग नव्हते, सॅनिटायझरची सोय करण्यात आली नाही म्हणून पोलिसांनी कामगारांना पोलिस ठाण्यात आणले. कामगारांना पोलिस घेवून गेले असल्याची माहिती संबधित बांधकाम सेंट्रीग ठेकेदार हेमंत नडगिरे यांना समजताच ते पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आले होते. यावेळी त्यांना अचानकच चक्कर आली व ते कोसळले. त्यांना त्वरीत शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण त्यांचा औषध उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तपास पोलिस निरीक्षक सचिन सुगांवकर करीत आहेत.

आठ तासानंतर पंचनामा :

दरम्यान, हेमंत नडगिरे यांचा मृत्यू होऊन आठ तास उलटून गेले तरी तहसीलदार यांच्या समक्ष अथवा त्यांच्या प्रतिनिधी समवेत पंचनामा करणे जरुरीचे असताना तहसील कार्यालयाने घेतलेल्या भुमिकेमुळे कुणीही उपस्थित होत नसल्याने पंचनामा करण्यास उशीर झाला त्यांनंतर रात्री नऊ वाजता तहसीलदार यांनी प्रतिनिधीची नेमणूक केली रात्री उशीर पर्यत पंचानामा सुरूच होता. त्यामुळे शवविच्छेदन झाले नाही.

त्या मृतदेहाचा शवविश्चेदन सोलापुरला होणार

दरम्यान मृत व्यक्ती अचानक चक्कर येऊन मयत झाला असला तरीही तो मृत व्यक्ती पोलीस ठाणेच्या आवारात मयत झाल्याने कायदेशीर बाबी करता सोलापुर येथे तीन डॉक्टरच्या पॅनल समोर इन कॅमेरा त्या मृत व्यक्तीचे शवविश्चेदन होणार आहे .