बार्शी तालुक्यातील रस्ते व पुल दुरूस्तीसाठी 71 लाख रुपयांचा निधी मंजूर – आ. राजेंद्र राऊत

0
343

बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते व पुल दुरूस्तीसाठी 71 लाख रुपयांचा निधी मंजूर – आ. राजेंद्र राऊत                               

बार्शी: बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची व पुलांची देखभाल दुरुस्ती व  सुधारणा करण्यासाठी सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता 71 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली.  तसेच तालुक्यातील इतर रस्त्यांकरिताही लवकरच जास्तीत जास्त निधी उपलब्ध होणार असल्याचेही राऊत म्हणाले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन 2019-2020 या आर्थिक वर्षाकरिता लेखाशिर्ष 3054 – 2419 रस्ते व पुल परिक्षण कार्यक्रम अंतर्गत गट ब व गट क करीता कामांना निधी मंजुर केला आहे.

3054 – 2419  हेड अंतर्गत रस्ते व पुल दुरूस्तीसाठी मंजूर झालेला निधी व तरतूद केलेल्या रस्त्यांची नावे पुढील प्रमाणे-                                                             


पांढरी ते वडगांव रस्ता सुधारणे करीता 15 लाख रुपये.     कापसी ते इंदापूर रस्ता सुधारणे करीता 15 लाख रुपये.     घारी ते पिंपळगाव,यळंब,चिखर्डे रस्ता सुधारणे करीता 14.50 लाख.शेलगांव (व्हळे.) ते खडकलगांव रस्ता सुधारणे करीता 14.50 लाख रुपये.सौंदरे ते बावी (आ.) रस्ता मध्ये सेतू पुल बांधणे करीता 2 लाख रुपये.भातंबरे ते बोरगांव (झा.) सेतू पुल बांधणे व सेतू पुलासाठी संरक्षक भिंत बांधणे करीता 10 लाख रुपये.

सदरील रस्त्याची कामे व पुल दुरूस्ती मंजूर करण्यासाठीआमदार राजेंद्र राऊत यांनी सातत्याने महाराष्ट्र शासनाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. त्यांनी स्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती महाराष्ट्र शासनास केली होती. असे पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here