बार्शी तालुक्यातील जामगाव येथील रुग्ण सारी पॉझिटिव्ह ; आज एकूण 16 पॉझिटिव्ह

0
120

बार्शी तालुक्यातील जामगाव येथील रुग्ण सारी पॉझिटिव्ह ; आज एकूण 16 पॉझिटिव्ह

सोलापूर कोरोना ताजी स्थिती 282 जणांवर उपचार सुरू 279 बरे झाले

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर- सोलापूरात आजच्या स्थितीत 282 कोरोना बाधित रूग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर आत्तापर्यंत 279 जण बरे होवून घरी परत गेले आहेत. सोलापूरात आजच्या स्थितीत 624 पॉझिटिव्ह रूग्ण तर मृतांची संख्या 63 इतकी झाली आहे.

आत्तापर्यंत 6331 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे यातील 5890 अहवाल प्राप्त झाले असून 441 अहवाल प्रलंबित आहेत. एकूण 5266 अहवाल निगेटिव्ह आले असून 624 पॉझिटिव्ह आहेत. आज एका दिवसात 151 अहवाल प्राप्त झाले यात 135 निगेटिव्ह तर 16 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. यात 10 पुरूष 6 महिलांचा समावेश आहे. आज मृतांची संख्या 5 असून 3 पुरूष, 2 महिलांचा समावेश आहे.

आज ज्या व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या त्यांचे विभाग पुढीलप्रमाणे – गीतानगर 1 पुरूष. दाजीपेठ 1 पुरुष 3 महिला. न्यू बुधवार पेठ 1 पुरूष. रेल्वे लाईन 1 पुरूष. बाळीवेस 2 पुरूष, 1 महिला. भवानी पेठ 1 पुरूष. मराठा वस्ती भवानी पेठ 1 पुरूष. एमआयडीसी रोड 1 पुरूष. पाच्छा पेठ 1 महिला. कुमठा नाका 1 पुरूष. जामगाव बार्शी 1 पुरूष.

मृत व्यक्तींची माहिती पुढीलप्रमाणे – 74 वर्षीय पुरूष कुर्बानहुसेन नगर परिसर. 72 वर्षीय पुरूष कर्णिकनगर परिसर. 60 वर्षीय महिला उत्तर कसबा. 70 वर्षीय महिला जुना विडी घरकुल. 61 वर्षीय पुरूष समाधाननगर अ.कोट रोड. आत्तापर्यंत 63 व्यक्तींचा मृत्यू झाला असून यात 39 पुरूष तर 24 महिलांचा समावेश आहे.