बार्शी तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव; वैरागच्या त्या किराणा दुकानदाराची पुण्यातील चाचणी पॉझिटिव्ह

0
22

बार्शी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव , पहिला कोरोना पॉझिटिव्ह_वैराग येथील, १५ जण विलगीकरण कक्षात दाखल

बार्शी : वैराग ता.बार्शी येथे ३७ वर्षीय प्रसिद्ध किराणा व्यापाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आरोग्य विभाग व प्रशासनाकडून प्राप्त झाला आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण वैराग येथे आढळल्याने बार्शी तालुक्यात मोठी खळबळ आहे .

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

दरम्यान बार्शीचे तहसिलदार प्रदिप शेलार,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे, नायब तहसिलदार, नायब तहसिलदार संजीवन मुंढे , बार्शी गटविकास अधिकारी शेखर सावंत , वैरागचे तलाठी सतिश पाटील, बार्शी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.संतोष जोगदंड, वैराग वैद्यकिय अधिकारी डॉ. जयवंत गुंड, ग्रामविकास अधिकारी अनिल बारसकर यांच्या पथकाने वैराग येथे बैठक घेतली. त्या व्यापाऱ्याच्या संपर्कात आलेल्या १५ जणांचा शोध घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना वैरागच्या बाहेर एका संस्थेच्या विलगीकरण कक्षात दाखल केले.

याबाबत माहिती देताना तहसिदार प्रदिप शेलार यांनी सांगितले की, कोरोनाची लागण झालेल्या त्या व्यापाऱ्यास पुणे येथे उपचार सुरु आहेत. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या ८ ते १० व्यापारी, दुकानातील व घरगुती कर्मचारी अशा १५ जणांची सासुरेफाटा येथील हॉस्पिटल मधे स्थापन केलेल्या संस्थात्मक विलगीकर कक्षात दाखल केले असल्याचे त्यांनी सांगितले.

तर वैराग येथील तो व्यापारी तेल, साखर व किराणा मालाचा ठोक व घाऊक विक्रेता आहे.त्याच्या संपर्कात मोहोळ, तुळजापूर, उत्तर सोलापूर, माढा व बार्शी या तालुक्यातील सुमारे ३०० ते ४०० किराणा व्यापारी व खरेदीदार आले आहेत. शिवाय त्यांच्या संपर्कात आलेल्या व त्यांचे नातेवाईक असलेल्या अकलूज येथील १८ जणांना इतर ठिकाणी विलगीकरणाचे काम सुरू असल्याचे प्रांत अधिकारी हेमंत निकम यांनी सांगितले.

याबाबत पोलीस प्रशासनाकडून माहिती दिली की, दुकानाच्या सी सी टी.व्ही .फुटेजमधून प्रशासनास प्राप्त झाली आहे. त्यानुसार संपर्कातील लोकांना ताब्यात घेतले आहे. ही वार्ता शहरात प्राप्त होताच वैराग शहर पुर्ण लॉग डाऊन केले असून सर्व व्यवहार बंद झाले आहेत.

रात्री उशिरा वैराग कंटेन्मेंट झोन म्हणून ही जाहीर केले आहे.

दरम्यान मुंबई येथून तालुक्यातील जमगाव येथे आलेल्या एका व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने त्याला पुढील तपासणी साठी सोलापूर ला हलविण्यात आले आहे. ग्रामपंचायत च्या वतीने दक्षता म्हणून जमगाव ही सील करण्यात आले आहे. त्या व्यक्तीचा अहवाल अद्याप आलेला नाही.