बार्शी केमिस्ट असोसिएशनची सामाजीक बांधिलकी पोलिसांना कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य वाटप

0
85

केमिस्ट असोसिएशन जपली सामाजीक बांधिलकी

बार्शी: करोना विषाणूचा सुंसर्ग पासरूनये या साठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. परंतु त्यांच्या आरोग्यासाठी बार्शी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या वतीने बार्शी पोलीस स्टेशन मधील सर्व अधिकारी तसेच कर्मचाऱ्या साठी बार्शी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी साहेब याच्या उपस्थितीत सॅनिटांयझर , मास्क, हँड ग्लोज मोफत देण्यात आले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

तसेच विविध चौकात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली .तसेच नागरिकांना करोना या विषाणूची जनजागृती करण्यासाठी बार्शी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन ची वायरलेस साऊंड सिस्टीम वापरण्यासाठी देण्यात आली.


आपटे एजेंसिज चे मालक अमित आपटे यांनी आजुन २००० सॅनिटांयझर विना मोबदला आलेल्या किमतीत नागरिकांसाठी उपलब्ध करणार आहोत अशी ग्वाही दिली या वेळी तालुकाध्यक्ष सुधीर राऊत, जिल्हा कार्यकारणी सदस्य अभिजीत गाढवे, सचिव मोईझ काझी, खजिनदार गणेश बारसकर रमेश कोंढरे,सचिन गोसावी उपस्थित होते.