बार्शीत वृध्द महिलेच्या गळ्यातील गंठन पळविले

  0
  27

  बार्शीत वृध्द महिलेच्या गळ्यातील गंठन पळविले

  बार्शी प्रतिनिधी :

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  येथील मल्लाप्पा धनशेटटी रोड साधाना बारच्या शेजारी खारी टोस्टचा व्यवसाय करणाऱ्या वृद्ध महीलेकडे गिऱ्हाईक बनुन आलेल्या दोन चोरट्याने त्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मीनीगंठन हिसका मारून दुचाकीवरून पळुन गेल्याची घटना गुरुवार दि १२ रोजी दुपारी  १ वाजण्याच्या सुमारास घडली .

  याबाबत बानुबी शौकत तांबोळी या महिलेने बार्शी शहर पोलीसात फिर्याद नुसार दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

  फिर्यादित म्हटले की दोन अनोळखी तरूण दुचाकीवरून येऊन त्यातील एकाने पाणी बॉटल थमसफ आदी वस्तु घेऊन नंतर वेफर्स मागितले त्याचे वजन करून देत असताना चोरटयाने अचानक गळ्यातील २२ ग्रॅम  वजनाचे सोन्याचे सुमारे ६० हजार रुपये किंमतीचे मिनीगंठन जोराने हिसका मारून घेऊन पळुन जावुन उभारलेल्या दुचाकीवर बसुन निघुन गेले यावेळी महिलेनी आरडाओरड केली असता तो पर्यंत चोरटे तेल गिरणी चौकच्या दिशेने पळुन गेले . याबाबत अधिक तपास बार्शी शहर पोलीस करित आहेत .