बार्शीतुन चोरलेली ब्रिझा कार माढा पोलिसांनी पकडली; आरोपी जेरबंद

0
224

बार्शीतुन चोरलेली ब्रिझा कार माढा पोलिसांनी पकडली; आरोपी जेरबंद

माढा प्रतिनिधी – बार्शी शहरातील भवानी पेठ येथून मारुती कंपनीची ब्रिझा ही चारचाकी कार चोरुन पलायन करत असताना माढा पोलिसांनी नाकाबंदी करत आरोपीसह गाडी ताब्यात घेतली.
ही घटना माढा शहरात पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


या प्रकरणी अमजद अन्वर शेख वय-३२ वर्ष, रा.बाशींगे प्लॉट, बार्शी यास ताब्यात घेण्यात आले आहे.

माढा पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की,
मारुती कंपनीची ब्रिझा कार नं. M.H.-13-C.S. 4141 बार्शी शहरातुन चोरीस गेलेली आहे व सदर गाडी माढ्याच्या दिशेने येण्याची शक्यता आहे.


खात्रीशीर माहिती मिळाल्यावर पोलीसांनी तत्काळ माढा शहरातील कुर्डूवाडी बायपास चौक व छ.शिवाजी महाराज चौक येथे नाकाबंदी केली.


12.30 वाचे सुमारास कुर्डूवाडी बायपास चौक माढा येथे पो.हेकॉ. शिंदे, स.पो.फौ. खंडागळे व इतर पोलीस स्टाफ हे वाहन तपासणी करत असताना सदरची गाडी मिळुन आली.

याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता गाडीतील इसमाने आपण ही गाडी भवानी पेठ बार्शी येथुन चोरल्याचे सांगितले.
अमजद अन्वर शेख वय-३२ वर्ष, रा.बाशींगे प्लॉट, बार्शी असे याचे नाव असून गाडी चोरीला गेल्याची तक्रार बार्शी शहर पोलीस ठाण्यात नोंद असल्याची खात्री करत सदर आरोपी माढा पोलिसांनी बार्शी पोलीसांच्या ताब्यात दिला.


ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर बार्शी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक शाम बुवा, पो.स.ई. घोंगडे, स.पो.फौ. खंडागळे, पो.हेकॉ. शिंदे, पो.ना. देशमुख, पो.ना. शिंदे यांनी केली.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here