बार्शीतील कोविड केअर सेंटरचा घोळ सुरूच; आता याठिकाणी होणार कोविड केअर सेंटर

0
412


बार्शीतील कोविड केअर सेंटरचा घोळ सुरूच

आता बीआयटी मध्ये नव्हे तर समाजकारण विभागाच्या क्वारन्टाईन सेंटरलाच कोविड केअर सेंटर करण्याचा प्रस्ताव

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


बार्शी:  महसूल व आरोग्य प्रशासनाने बार्शीतील बीआयटी कॉलेज कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी ताब्यात घेतले आहे खरे मात्र याठिकाणी कोविड केअर सेंटर करण्यात संस्था प्रशासनाचा विरोध असल्याने तालुका प्रशासनाने सध्या समाजकल्याण वसतिगृहात असलेल्या क्वारन्टाईन सेंटरलाच कोविड केअर सेंटर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

त्यासाठी तसा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी सोलापूर ला पाठवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे तहसीलदार प्रदीप शेलार यांनी सांगितले.

 तालुक्यातील पॉझिटिव्ह असलेल्या 11 रुग्णापैकी एकावर पुणे तर अन्य एकावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत. उर्वरित 9 जणांना  बीआयटी मध्ये उपचारासाठी दाखल केले जनार होते .. मात्र याठिकाणी  रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या निवासाची सोय नाही. बीआयटी प्रशासनाने काही रूम ताब्यात दिल्या आहेत.  महसूल प्रशासनाने त्यांना हॉस्टेलच्या रूमची मागणी करून ही ताब्यात दिलेल्या नाहीत. तसेच त्यांचा बीआयटी मध्ये कोविड सेंटर करण्यास विरोध असल्याने तालुका प्रशासनाने त्याचा नाद सोडून दिला आहे.

ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी सध्या क्वारन्टाईन सेंटर सुरू आहे. त्यासाठी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.त्याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. तर क्वारन्टाईन केले असलेले लोक समोरच असलेल्या आयटीआय कॉलेजच्या इमारती मध्ये हलविले जाणार असल्याचे तहसीलदार प्रदीप शेलार यांनी रात्री उशिरा लोकमत शी बोलताना सांगितले. तसेच या बदलाचा प्रस्ताव मंजूरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याचे काम ही सुरू असल्याचे शेलार म्हणाले.


Best IT Comany In Maharashtra , Solapur