बार्शीच्या कर्मवीर स्काॅलर अकॅडमीच्या प्रणिता मुळीक हिला गणिताला 100 गुण
बार्शी: श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी, संचलित कर्मवीर स्काॅलर अकॅडमी ची कु. मुळीक प्रणिता प्रवीण या विद्यार्थिनीने बारावी बोर्ड परीक्षा २०२० मध्ये गणित विषयामध्ये १०० पैकी १०० गुण प्राप्त केले.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


महाराष्ट्र विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या प्रणिता हिने बार्शी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्याबद्दल तिला श्री शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. व्ही. जे. देशमुख यांनी जाहीर केलेले ५००० रूपयांचे बक्षीस मिळवले. या विद्यार्थिनीस प्रा. व्ही. जे. देशमुख यांचे वैयक्तिक मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य देवेंद्र पाटील ,व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी तिचे व प्रा. व्ही. जे. देशमुख यांचे अभिनंदन केले.