बरं ते जॅकेट कायमचं उतरलं की हा “lockdown look” आहे – वरून सरदेसाई
ग्लोबल न्युज : कोरोना संसर्ग आजाराच्या संकटात चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या आणि जनतेचा आशीर्वाद मिळवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे उभा असलेला जनतेचा पाठिंबा बघून सध्या भाजपा नेत्यांच्या पोटात दुखू लागले आहे.

त्यामुळे हे सरकार अस्थित करण्यासाठी भाजपा नेत्यांच्या राज भवनांवरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. सध्या राज्यात आणीबाणी आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार समूहाची मुस्कटदाबी हे सरकार करत आहे आशा आरोपाचे पत्र घेऊन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीला गेले होते तसेच त्यांना निवेदन सुद्धा दिले. मात्र या भेटीवर युवासेना सचिव वरून सारदेसाई यांनी फडणवीसांना चांगलाच टोला हाणला आहे.

“बरं ते जॅकेट permanently उतरले आहे की, Lockdown look आहे ? असा सवाल उपस्थित करत सारदेसाई यांनी फडनवीसांना चिमटा काढला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात भाजपा आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळणार आहे. एकीकडे राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असताना विरोशी पक्षाने सरकारच्या खांद्याला खांदा लावून उद्भवलेल्या संकटाशी सामना करण्याचे सोडून विरोशी पक्षाने फक्त सत्ता हवसे पोटी पुन्हा राजकारण करणे चालू केले आहे.
