फुटपाथवर झोपणाऱ्या पोलिसांच्या मदतीला धावले आदित्य ठाकरे, दिली शिवालयाची चावी

0
147

फुटपाथवर झोपणाऱ्या पोलिसांच्या मदतीला धावले आदित्य ठाकरे, दिली शिवालयाची चावी

सुरज गायकवाड
ग्लोबल न्यूज: देशभरात कोरोनाच्या संसर्ग आजराने हाहाकार माजवलेला असताना राज्यात देखील कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढत चालली आहे. त्यात मुंबईची वाढती संख्या तर अत्यंत धक्कादायक वळणावर असलेली दिसून येत आहे. त्यामुळे जनतेच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील अनेक ‘एसआरपी’ कंपन्या तातडीनं बोलावून घेण्यात आल्या आहेत. सोलापूर ‘एसआरपी कॅम्प’मधील एक तुकडीही ‘कोरोना वॉरियर्स’ म्हणून मुंबईत दाखल झाली होती.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूरहून मुंबईला दाखल झालेल्या या तुकडीतील जवानांनी मुंबई गाठल्यानंतर रात्री चक्क पुटपाथवरच बिछाना टाकला. पुटपाथवर झोपलेला फोटो मंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचताच, त्यांनी या पोलिसांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला.

आपल्या शासकीय निवासस्थानाची आणि शिवालयाची चावीही त्यांनी पोलिसांसाठी पाठवली होती. मात्र, तत्पूर्वी पोलीस प्रशासनाने त्यांच्या विश्रांतीची व्यवस्था केली होती. मुंबईत पोहोचलेले सोलापूरचे शंभर जवान रस्त्यावरच्या फुटपाथवरच कशीबशी वळकटी पसरून झोपल्याचे फोटो सोशल मीडियावर पाहून अनेकांना धक्काच बसला.

त्यावरून प्रशासनावर टीकाही होत होती. मात्र, हे फोटो पाहून आदित्य ठाकरेंसह संबंधित यंत्रणांनी तातडी योग्य कार्यवाही केल्याचे समोर आले आहे. फोटो पाहताच, आदित्य ठाकरेंनी संबंधित अधिकाऱ्यांकडून या पोलिसांबाबत माहिती घेतली. पोलिसांना निवारा मिळावा यासाठी आपल्या सरकारी बंगल्याची चावीच (A6) त्यांनी देऊ केली.